तुळशी विवाहापूर्वीच सुरु झाली लगीन घाई!

तुळशी विवाहापूर्वीच सुरु झाली लगीन घाई!

येवला - लग्न म्हटले की एप्रिल व मे हे दोनच महिने डोळ्यापुढे येतात. मात्र, यंदा नोव्हेबरपासूनच लगीनघाई सुरु झाली असून काही पंचांगांनी तर तुलसीविवाहाच्या अगोदरच मुहूर्त दिल्याने आच्छर्य व्यक्त होत आहे.असे असले तरी २१ तारखेपासून विवाह सुरु होत असून या वर्षी ७५ वर विवाह मुहूर्त असले तरी दुष्काळाने ग्रामीण जीवनाचे अर्थचक्र मंदावले असल्याने यंदा विवाहांची संख्या रोडावणार हे नक्की!

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वपरं सिद्धिदं...‘ मंगलाष्टकांचे हे स्वर एप्रिल, मे महिन्यांत हमखास कानी पडतात.यंदाच्या हंगामात विवाहमुहूर्त मार्च व एप्रिलमध्ये मध्ये अत्यल्प आहेत.तर फेबुवारी,मे आणि जून मध्ये मात्र विवाह तारखा दुपटीने असल्याचे चित्र आहे.तर डिसेंबरमध्ये नऊ व फेब्रुवारी मध्ये तेरा विवाह मुहूर्त असल्याने अनेकांनी डिसेंबरमध्येच विवाह निच्छित केलेले आहेत.पुढे फेब्रुवारी मध्ये मुलांच्या परीक्षा असतात,त्यामुळे अनेकाकडून या महिन्यात विवाह टाळले जातात पण यावर्षी मुहूर्त अधिक असल्याने सुरुवातीलाच अधिक बार उडतील असे चित्र आहे.

यंदा मंगळवारी (ता.२०) तुलसीविवाह असून त्यादृदीने वधू-वर पित्यांनी लग्नाचे नियोजन केले आहे.यंदा कमीअधिक तिथी असल्या तरी यंदा दुष्काळाने आर्थिक कंबरडे मोडले असून यामुळे विवाह संख्या घटणार आहे. याचा परिणाम बाजारपेठेत दिसून येणार आहे.ज्यांनी डिसेंबरमध्ये विवाह निश्चित केले त्याची कपडे, मंडप, आचारी, केटरर्स, मंगल कार्यालय,लॉन, बॅण्ड, भटजी आदींसह व्यावसायिकांकडे नोंदणी झाली आहे.

१२ डिसेंबरपासूनच शुभ विवाह - डॉ.कुलकर्णी
काही पंचांगांचे मुहूर्त वेगळे वेगळे असले तरी तुळशी विवाहानतरच विवाह सुरू होतात अशी माहिती येथील पंचांग अभ्यासक डॉ. प्रसादशास्त्री कुलकर्णी यांनी दिली.काही अपवादात्मक पंचांगांनी नोव्हेंबर मध्ये १६,२१,२३,२५,२६ या तिथी दिल्या आहेत परंतु दाते पंचांग या अमान्य करते.पंचाग व अभ्यासक गुरूचा अस्त असल्याने या तिथींना अनुमती देत नाहीत. डिसेंबरमधील २,३,४,५,६,८ या तिथींना देखील दाते पंचांगानुसार संमती नाही. मात्र डिसेंबरमध्ये १२ तारखेनंतरच्या तिथी विवाहासाठी शुभ आहेत.१२ डिसेंबर ते ३ जुलैपर्यंत ७५ वर विवाह तिथी असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

या आहेत यंदाच्या विवाह तिथी..
-डिसेंबर - १२,१३,१७,१८,२२,२६,२८,२९,३०,३१
-जानेवारी - १७,१८,१९,२०,२३,२४,२९
-फेब्रुवारी - २,३,५,६,११,१३,१४,१६,१७,१९,२१,२८
-मार्च - १,२,५,६,१०,११,१४,१५,१६,१८
-एप्रिल - १७,१९,२०,२१
-मे - ४,७,८,९,१४,१६,१७,१९,२१,२२,२३,२७,३१
-जून - २,३,५,६,८,१०,१२,१५,१७,१८,१९,२०,२८
-जुलै - १,२,३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com