ग्रामीण भागातील महिला व युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे : किर्ती जाधव

satana
satana

सटाणा - महिला सक्षम झाल्यास देशात विकासात्मक परिवर्तन घडेल. ग्रामीण भागातील महिला व युवतींना आर्थिक सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करीत असताना कुटुंबीयांनी देखील व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन किर्ती ब्युटी क्लिनिक आणि कीर्तिज अकॅडमीच्या संस्थापक किर्ती जाधव (नाशिक) यांनी येथे केले. 

येथील लाडशाखीय वाणी समाज कार्यालयात नाशिकच्या किर्ती ब्युटी क्लिनिक आणि कीर्तिज अकॅडमीतर्फे महिला सक्षमीकरण अंतर्गत कसमादे परिसरातील महिला व युवतींसाठी आयोजित एकदिवसीय ‘सौंदर्यशास्त्र’ प्रशिक्षण शिबीर व शैक्षणिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती जाधव बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या सिडिस्कॉ स्किन नॅचुरोपथी अँड ब्युटी थेरपी पदवी विद्यालय आणि अकॅडमीच्या संचालिका वंदना जगताप, बॉलिवूडचे मेकअप आर्टिस्ट राजू ओर्पे (मुंबई), जळगावच्या ‘नमो’ ब्युटी सेल्सचे गिरीश शर्मा, घनश्याम जाधव आदि उपस्थित होते. कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना महिलांनी स्वत:मध्ये गुणवत्ता निर्माण केल्यास त्यांना पैसा व यश हमखास मिळते. सर्वसामान्य कुटुंबातील महिला व युवतींना पार्लरचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे कार्य अकॅडमीतर्फे सुरू असल्याचेही श्रीमती जाधव यांनी स्पष्ट केले. वंदना जगताप यांनी पार्लर व्यवसायासाठी असलेल्या विविध पदवी परीक्षांची माहिती दिली. बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट राजू ओर्पे यांनी पार्लरच्या कमीत कमी साहित्यातूनही अधिकाधिक सुंदर मेकअप करण्याची विविध प्रात्यक्षिके सादर केली. 

प्रशिक्षण शिबीरास स्वाती कंगे, स्मिता ततार, सुनीता खैरनार, सुजाता शिंदे, रंजना भोये, रंजना अहिरे, ज्योती खैरनार प्रिया सोनवणे, सोनी आहिरे, रिद्धी आहिरे, गौरी आहिरे, वैशाली बनकर, रत्ना सोनवणे, प्रतिभा आहिरे, पूनम चौधरी, प्रीती ठक्कर, रंजना गोसावी, रुचिरा पगारे, सविता उगले, वैष्णवी सोनवणे, जयश्री पाटील, आशा ठोंबरे, दीपाली पाटील आदींसह बागलाण, कळवण, मालेगाव, देवळा, मेशी, डांगसौंदाणे, पिंपळनेर आदि गावातील शेकडो महिला सहभागी होत्या. कल्पना पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com