रेल्वेगाड्यांचे डबे आजपासून बदलणार 

रेल्वेगाड्यांचे डबे आजपासून बदलणार 

नाशिक - पंचवटी एक्‍स्प्रेसच्या धर्तीवर लोकमान्य टिळक टर्मिनस-निझामाबाद अजनी एक्‍स्प्रेससह आणखी इतरही अनेक दूर पल्ल्याच्या सहा रेल्वेगाड्यांच्या डब्यांची रचना बदलली जाणार आहे. 

सध्याच्या डब्यांऐवजी पुढील महिन्यापासून लिंक हॉकमन बॉट (एलएचबी) रचनेचे डबे टप्प्याटप्प्याने विविध गाड्यांना लावले जाणार आहेत. सध्याच्या डब्यांच्या तुलनेत अधिक लांब असलेल्या या डब्यांमुळे रेल्वेगाड्यांची लांबी वाढणार आहे. उद्यापासून (ता. 22) होणाऱ्या या बदलात दूर पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस-निझामाबाद या गाडीपासून बदलाला सुरवात होणार आहे. पाठोपाठ रविवारी (ता. 23) निझामाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस या गाडीचे डबे बदलले जातील. सोमवारपासून (ता. 24) होणाऱ्या बदलांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस- अजनी तसेच नागपूर-रिवा या गाड्यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com