रहीपुरीत अडीच एकर ऊस जळून खाक

रहीपुरीत अडीच एकर ऊस जळून खाक

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : रहीपुरी (ता.चाळीसगाव) येथुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चार एकर ऊसाच्या बेणे प्लॉटला आज सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत आडीच एकर ऊस व ठिबक जळून खाक झाले. दिड एकर ऊस ग्रामस्थांनी वाचवला. या आगीत सुमारे सहा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान अनेक शेतामध्ये विज वाहिनीच्या तारा लोबंकळत असल्याने त्या वरती कराव्यात आशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

रहीपुरी येथील रामचंद्र वाणी यांच्या गट नंबर 88 मध्ये ऊसाचा चार एकराचा बेणे प्लॉट तयार झालेला होता. या शेतातच विज वितरण कंपनीचा डीपी बसवलेली आहे. या डीपीच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ऊसाला आग लागली. लागलेली आग ऐवढी भयंकर होती की, आटोक्यात येणे शक्य नव्हते. या घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. चार एकर क्षेत्रात असलेल्या ऊसाच्या मध्यभागी काही ग्रामस्थांनी ऊसाच्या शेतात प्रवेश करत आर्ध्यावर भाग केला. यामुळे दिड एकर ऊसाचे क्षेत्र ग्रामस्थांनी केलेल्या मदतीने वाचले.

सहा लाखाचे नुकसान

या आगीत जवळपास सहा लाखाचे नुकसान झाले. या ऊसाची रोपे कोल्हापूर येथुन आणुन लागवड केली होती. साधारण एका ऊसाच्या बेटात आठ ते दहा ऊस आज तयार होते. या ऊसाच्या प्लॉटवर सेवानिवृत्त कृषीधिकारी एन.एम.साळुखे यांचे मार्गदर्शन व निगराणीत ऊसावर लक्ष ठेवून होते. साळुंके यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले की, माझे या प्लॉटचे झालेले नुकसान म्हणजे माझे स्वतःचे बौद्धीक नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली.

वीजवितरणचा गलथान कारभार

मेहुणबारे सह परिसरात विजेच्या शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याच्या बऱ्याच घटना यापुर्वी घडल्या आहेत. यातून केवळ शेत शिवारात लोंबकळणाऱ्या विजतारा हेच कारण पुढे येत आहे. शेतकरी शेतात राबराब राबत असतो. दुष्काळ सदृश्य परिस्थिती शेतकऱ्यावर हा नुकसानीचा घाला येत आहे. रहीपुरी येथील घटनास्थळी आद्यापही उशिरा पर्यंत पंचनामा करण्यासाठी प्रशासनाचे सायंकाळ पर्यंत कोणीही पोहचले नव्हते.

डीपी काढुन दुसरीकडे बसवा

ऊसाचे नुकसान झालेले शेतकरी यांचे यापुर्वी देखील तीन एकर ऊस जळाला होता. वाणी यांचे शेत गोकुळ बिडे यांनी निमबटाईवर केले आहे. आज या नुकसानीचा मोठा फटका बिडे यांना देखील बसला आहे. त्यामुळे शेतातील डीपी काढुण दुसरीकडे बसवावी आशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com