‘व्हॅरिकोस व्हेन्स’ची बाधा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक

‘व्हॅरिकोस व्हेन्स’ची बाधा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक

नाशिक - भारतात जास्त वेळ उभे राहण्याबरोबरच जास्त वेळ बसून राहणेही तितकेच आरोग्यासाठी कारणीभूत व घातक ठरत असल्याचे ‘व्हॅरिकोस व्हेन्स’च्या रुग्णांच्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, व्हॅरिकोस व्हेन्सची समस्या असणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त आढळले आहे. 

विशेष म्हणजे या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळून येत आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आणि वजन आटोक्‍यात ठेवले तर या समस्या टळतील, असा संदेश जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. 

पायाकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नीला (Vein) वाहिन्यांचा घेर विस्तृत होऊन (फुगून) त्या कालांतराने पिळवटू लागतात. याला ‘व्हॅरिकोस व्हेन्स’ असे म्हणतात. रक्तवाहिन्यांमधील सतत उच्च रक्तदाब आणि निकामी झालेल्या झडपा यामुळे हा प्रकार होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पाश्‍चात्त्य देशांमध्ये १०-२० टक्के लोकांमध्ये व्हॅरिकोस व्हेन्सची समस्या आढळून येते. परंतु भारतामध्ये कमी प्रमाणात म्हणजे पाच टक्के लोकांमध्ये हे आढळून येते. त्यामध्येही उत्तर भारतीय लोकांपेक्षा अंदाजे पाचपट जास्त प्रमाण दक्षिण भारतीय लोकांमध्ये आढळून येते. 

कुठल्या व्यक्तींमध्ये होतात व्हॅरिकोस व्हेन्स?
-दीर्घकाळ उभे राहण्याचा व्यवसाय असलेल्या व्यक्ती (जसे कंडक्‍टर, शिक्षक, मजूर), गर्भवती महिला, स्थूल प्रकृती असणाऱ्या व्यक्ती, आनुवंशिकता, वयोमानानुसार झडप निकामी होणे किंवा निलांची भिंत पातळ होणे. 

  याची काय लक्षणे असतात?
-सुरवातीच्या दिवसांत संध्याकाळच्या वेळेस पाय दुखणे, घोट्याजवळचा भाग लाल/काळसर पडणे, पायाला खाजव येणे, त्यातून पाणी येणे, पोटरीच्या भागात गाठी जाणवणे ही लक्षणे दिसू लागतात. योग्य वैद्यकीय सल्ल्याअभावी कालांतराने पायाच्या घोट्याच्या भागात जखमा होऊन त्या काही केल्या सावळत नाहीत. फुगलेली रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होण्याचीही दाट शक्‍यता असते.

  या समस्येवर उपलब्ध उपचार 
ही समस्या लवकर लक्षात आली तर विशिष्ट प्रकारचे मोजे (Compression Stockings) वापरणे, पाय उशीवर वरती उचलून ठेवणे, शक्‍य झाल्यास कामाचे स्वरूप बदलणे. 

व्हॅरिकोस व्हेन्सची लक्षणे असल्यास प्लॅस्टिक सर्जनना दाखवून त्यांच्या सल्ल्याने दोघे पायांच्या योग्य त्या तपासण्या (पायांची सोनोग्राफी) करून घ्याव्यात. शस्त्रक्रियेची गरज असल्यास ती करून घ्यावी. वेळीच उपचार व डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार काही गोष्टी पाळल्यास निश्‍चित आराम मिळतो.
-डॉ. किरण नेरकर, प्लॅस्टिक सर्जन, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com