कांद्यासाठी केलेला खर्चही कांदा विक्रीतून निघत नसतांना, मका देतोय हात

कांद्यासाठी केलेला खर्चही कांदा विक्रीतून निघत नसतांना, मका देतोय हात

खामखेडा (नाशिक) - जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मक्याला दीड हजार ते १,७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत होता. मात्र, गेल्या आठवड्यात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच मक्याला २ हजारांचा दर ओलांडून तो २१००रुपयांवर पोहोचला. वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण असले तरी वाढलेल्या भावाचे लाभार्थी शेतकरी मात्र कमीच असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे.

कळवण व परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माघील आठवड्यात मक्याला विक्रमी २,१५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर दुसरीकडे देवळा तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी देखील २,१५० रुपये दराने मका खरेदी केला. यामुळे दुष्काळात बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवसांत मक्याला आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या आजपर्यंच्या इतिहासात पहिल्यांदाच मक्याला उच्चांकी भाव मिळाला असून, दुष्काळामुळे उत्पादन घटले अन् मालाला भाव आला. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाव वाढलेले असताना बाजार समित्यात आवक मात्र पाच ते सहा हजार क्विंटलच्या आतच असल्याने मोजक्याच शेतकऱ्याना या वाढलेल्या भावाचा फायदा होत आहे.

मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने भाव वाढल्याचे देवळा येथील व्यापारी डी. के. गुंजाळ यांनी सांगितले. एकीकडे कांद्यासाठी केलेला खर्चही कांदा विक्रीतून निघत नाही, तर दुसरीकडे हमीभावापेक्षा ४०० रुपयांहून अधिक दराने मक्याची व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे.       

पावसाअभावी उत्पादनात मोठी घट सध्या देवळा तालुक्यातील भउर परिसरात मक्याने उच्चांक गाठला असून, प्रतिक्विंटल तब्बल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. पावसाअभावी उत्पादनात घट झाली असून, काही शेतकऱ्यांनी आधीच मका विक्री केली. त्यामुळे आता मक्याची भाववाढ झाल्याने त्याचा मोजक्याच बळीराजाला लाभ होत आहे.

माघील पाच वर्ष्यातील बाजारभाव यापूर्वी सन २०१५ मध्ये ११५० रुपये, २०१६ मध्ये १२५०, २०१७ मध्ये १३००, २०१८ मध्ये १६०० रुपये व सध्या २०१९ मध्ये मक्याची खरेदी २१०० रुपये प्रतिक्विंटलने सुरू असल्याने मक्याला सध्या अच्छे दिन आले आहेत.  

पावसाअभावी एकतर मोठ्या प्रमाणात यावर्षी उत्पादनात घट झाली.तसेच या वर्षी दुष्काळ असल्याने उन्हाळी मक्याची लागवड नगण्य आहे.व मागणी असल्याने बाजार तेजीत आहे.
- अरुण पवार, स्वप्निल अग्रो भऊर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com