लाच घेताना तहसीलदाराला अटक

File photo
File photo

गडचिरोली : विटाभट्टीच्या परवान्यासाठी एका व्यावसायिकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना आरमोरी येथील तहसीलदार यशवंत तुकाराम धाईत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी अटक केली.
आरमोरी येथील वीटभट्टी व्यावसायिकाने परवान्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी त्यांनी 7 हजार 870 रुपयांचे चालान जिल्हा सहकारी बॅंकेत भरले होते. मात्र, त्यांना अनेक दिवस मंजुरी मिळाली नाही. संबंधित व्यावसायिकाने तहसीलदार धाईत यांची भेट घेतली असता, परवाना देण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आज, मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचून पाच हजारांची लाच घेताना तहसीलदाराला पकडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com