...तर गडचिरोली बायो एव्हिएशन फ्यूअलचे हब

नागपूर : ऍग्रोव्हिजनच्या समारोपीय सोहळ्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. व्यासपीठावर रमेश मानकर, रवी बोरटकर, डॉ. सी. डी. मायी, दत्ता मेघे, खासदार रामदास तडस व अन्य मान्यवर.
नागपूर : ऍग्रोव्हिजनच्या समारोपीय सोहळ्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. व्यासपीठावर रमेश मानकर, रवी बोरटकर, डॉ. सी. डी. मायी, दत्ता मेघे, खासदार रामदास तडस व अन्य मान्यवर.

...तर गडचिरोली बायो एव्हिएशन फ्यूअलचे हब
नागपूर, ता. 26 : बांबूपासून विमानाला लागणाऱ्या इंधन निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाल्यास एव्हिएशन फ्युअलवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. सोबतच विपुल प्रमाणात बांबूची उपलब्धता असलेला गडचिरोली जिल्हा बायो एव्हिएशन फ्युअलचे हब होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
सोमवारी ऍग्रोव्हिजनच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते. खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार आशीष जयस्वाल, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, डॉ. सी. डी. मायी, रवी बोरटकर, रमेश मानकर आदी उपस्थित होते.
सोहळ्यात प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आशीष आवटे (कृषी पूरक व्यवसाय), नितीन भिसे (जलसंधारण), रविप्रकाश कोरडे (दुग्ध उत्पादन), नीता सावदे (कोरडवाहू शेती), संगीता सावला (फलोत्पादन) यांचा समावेश आहे. ऍग्रोव्हिजन निबंध स्पर्धेचे विजेते जयराम जाधव, प्रेमराज शेडमाके, दीक्षा नागदेवते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक रवी बोरटकर यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. रमेश मानकर यांनी आभार मानले.
आदिवासींचा कायापलट
विदर्भात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. काही वर्षांपासून बांबू उत्पादनाला चालना मिळत आहे. बांबूपासून एव्हिएशन फ्युअल तयार करण्यासाठी प्रयत्न आणि प्रयोग सुरू झाले आहेत. दरवर्षी भारत तीस हजार कोटींचे एव्हिएशन फ्युअल इम्पोर्ट करतो. बांबूपासून इंधन निर्मिती शक्‍य झाल्यास देशाचे आर्थिक नुकसान टळेल. गडचिरोलीतील आदिवासींचा कायापालट या प्रकल्पामुळे होऊ शकणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com