रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने अट्टल चोर गजाआड

वरठी : अटकेतील आरोपी व कारवाई करणारे रेल्वे पोलिस पथक
वरठी : अटकेतील आरोपी व कारवाई करणारे रेल्वे पोलिस पथक

वरठी (जि. भंडारा) : मध्य प्रदेशातील कटंगी येथे दहा ते बारा दुकाने फोडून मुद्देमालासह पळून आलेल्या अट्टल व कुख्यात गुन्हेगार असलेल्या चोरट्याला वरठी (भंडारारोड) रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे गजाआड करण्यात आले. धर्मेंद्र सुखलाल सयाम (वय 19) रा. भीमपार (जि. डिडोरी, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 11 हजार 900 रुपयांची रोकड एक मोबाईल दोन एअर फोन, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (ता. 18) करण्यात आली.
सहायक उपनिरीक्षक विभा औतकर यांच्या सोबत मुख्य आरक्षक एस. के. वैद्य, पी. के. दुबे, विनोद चामलाटे हे भंडारारोड रेल्वेस्थानकावर गस्त घालीत होते. यावेळी त्यांना हा युवक संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला थांबवून रेल्वे पोलिसांनी चौकशी केली. त्याने आपले नाव गाव सांगितले. त्यांच्या वर्तनावरून संशय आढळल्याने त्याच्याकडे असलेली बॅग उघडून दाखविण्यास सांगितले, असता तो पळून जात होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीत आणले. त्याच्याकडील काळ्या रंगाची बॅग उघडून बघितली. त्यात 11 हजार 900 रुपयांची रोकड, मोबी स्टार कंपनीचा मोबाईल, दोन एअरफोन आढळून आले. पोलिसांनी हिसका दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. बुधवारी (ता. 17) कटनी येथील सीटी मार्केटमधील दहा ते बारा दुकानांचे कुलूप तोडून त्याने हा ऐवज चोरून आणल्याचे सांगितले.
आरोपी हा एक कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कटनी पोलिसांनी दिली. कटंगी येथील सहायक निरीक्षक रामभजन साहू, मुख्य आरक्षक तरुण सोनेकर हे पोलिस पथकासह शुक्रवारी वरठी रेल्वेस्थानकावर पोहोचले. आरोपी धर्मेंद्र सयाम याला मुद्देमालासह त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com