पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न

File photo
File photo

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न
नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा ठपक ठेवून पतीने मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोराडीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. शुद्धोधन चैतराम लांजेवार (वय 36, रा. करंभाळ, ता. पारशिवनी) असे आरोपीचे नाव आहे.
सुनील वासुदेवराव परतेकी (वय 35, रा. खंडाळा, ता. पारशिवनी) याची टाटा सफारी गाडी असून तो प्रवासी वाहतूक करतो. त्याची आणि आरोपी शुद्धोधन लांजेवार यांच्यात मैत्री होती. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. त्यातून सुनीलची शुद्धोधनच्या पत्नी मीरा (बदललेले नाव) हिच्याशी मैत्री झाली. दोघांच्याही मैत्रीमुळे शुद्धोधनला दोघांवर संशय होता. त्याच कारणामुळे दोघांत वाद झाला. मीराला मारहाण होत असल्यामुळे तिने पतीचे घर सोडून माहेर गाठले. त्यानंतर ती एका यात्रेतील आकाश झुल्यावर तिकीट कलेक्‍टर म्हणून कामाला लागली. पत्नी सोडून गेल्यामुळे आरोपी शुद्धोधन दारू प्यायला लागला. सोमवारी सुनील हा कोराडी देवीच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी तेथील यात्रेत मीराही काम करताना दिसली. दोघेही एका झाडाखाली बसून गप्पा करीत होते. दरम्यान, शुद्धोधनही देवीदर्शनासाठी तेथे पोहोचला. त्याला दोघेही गप्पा करताना दिसले. त्यामुळे त्याने सुनीलला अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण केली. काही नागरिकांनी मध्यस्थी करीत वाद सोडविला. त्यावेळी शुद्धोधनने त्याला पाहून घेण्याची धमकी दिली. दोघेही तेथून निघून गेले. काही वेळाने शुद्धोधन बायकोवर नजर ठेवण्यासाठी यात्रेतच दबा धरून बसला. रात्री दोनच्या सुमारास सुनील पुन्हा मीराला भेटायला आला. दोघेही अंधारात एका ठिकाणी गप्पा करीत बसले. दरम्यान, दबा धरून बसलेल्या शुद्धोधनने खिशातून चाकूसारखे अवजार काढून सुनीलच्या छातीत खुपसले आणि पळ काढला. क्षणातच सुनील रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. मीराने काही युवकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. या प्रकरणी तक्रारीवरून कोराडीचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कंकाळ यांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com