निवडणुका लागताच भाजपनेते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील ः पटोले

नाना पटोले
नाना पटोले

गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुका लागताच भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, नेते कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. लवकरच ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट माजी खासदार नाना पटोले यांनी केला.
येथील विश्रामगृहात रविवारी (ता. 21) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पटोले यांची कॉंग्रेसने महाराष्ट्र प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर त्यांनी रविवारी (ता. 21) गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराला सुरुवात केली.
नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात कॉंग्रेसच्या सुरू असलेल्या योजनांची नावे बदलली. याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम त्यांच्या कार्यकाळात झाले नाही. मागील कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचे प्रचारमंत्री म्हणून संपूर्ण कार्यकाळ चालविला. त्यावरही 2019 ला सत्ता मिळणार नाही, असे स्पष्टपणे दिसू लागल्याने ईव्हीएम सेट करून निवडणूक जिंकली. ईव्हीएमच्या भरवशावर सत्तेत आलेले हे केंद्राचे सरकार आहे. पुढील विधानसभा निवडणूक कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतर्फे पूर्ण जोमाने लढून जिंकून दाखविण्याचे आमचे प्रयत्न असतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच सत्तेत येईल, असा दावाही त्यांनी केला. पटोले यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com