गोंडपिपरीच्या भूमिपुत्राला अमेरिकेकडून दहा कोटींचे अनुदान

File photo
File photo

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुदर्शन कुरवडकर यांच्या एका प्रकल्पाला अमेरिकन सरकारने तब्बल दहा कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. स्पॅनिश विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या प्रकल्पावर ते काम करीत आहेत.
डॉ. कुरवडकर मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील रहिवासी आहेत.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात अमेरिकेसह देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यापीठात डॉ. कुरवडकर सहयोगी प्राध्यापक आहेत. याच विद्यापीठात चाळीस हजार स्पॅनिश विद्यार्थी आहेत. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयात इतरांच्या तुलनेत हे विद्यार्थी मागे असल्याचे डॉ. कुरवडकर यांच्या लक्षात आले. याच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक प्रकल्प तयार केला. त्यात स्पॅनिश विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी काय करता येईल, यावर विस्तृत उपाययोजना सांगितली. अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने या प्रकल्पाची दखल घेतली. त्यासाठी दहा कोटी रुपयांचे अनुदान त्यांना दिले. या रकमेचा उपयोग कॅलिफोर्निया विद्यापीठातील स्पॅनिश विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केला जाणार आहे. त्यांच्या या प्रकल्पाची दखल अमेरिकेतील लोकप्रतिनिधींनीसुद्धा घेतली. अनेक अमेरिकन खासदारांनी त्यांच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले.

डॉ.कुरवडकर कोण आहेत?
डॉ. सुदर्शन कुरवडकर कॅलिफोर्निया विद्यापीठात "विज्ञान आणि पर्यावरण' हा विषय शिकवितात. प्रदूषण निर्मूलनावर त्यांचे अध्ययन सुरू आहे. मागील वर्षी भारत सरकारच्या विनंतीवरून आयआयटी खरगपूर येथील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे गेस्ट लेक्‍चर आयोजित केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com