शिक्षणाच्या बसवर धोका स्वार!

Khamgaon.jpg
Khamgaon.jpg

खामगांव : शहरांमध्ये ऑटो, विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या गाड्या आपण रोजच पाहतो पण त्यापेक्षा भयानक आणि विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारे दृष्य सोमवारी दिवठाणा येथे दिसून आले. येथे विद्यार्थी एसटी बसच्या टपावर बसून प्रवास शाळेचा प्रवास करतांना  दिसून आले. त्यामुळे मुलभूत ग्रामीण भागात शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांवर अशी वेळ आली असूनही चिंतेची बाब आहे. याबाबत बस चालक  आणि वाहकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.

दिवठाणा येथे सोमवारी सकाळी शाळेचे विद्यार्थी बसमध्ये जागा नसल्यामुळे कवळगाव ते खामगाव या बसमध्ये दिवठाणा फाट्यावरुन गावातील शाळेत जाण्याकरीत उभे असतांना गाडी प्रवाशांनी गच्च भरलेली होती. त्यामुळे विद्यार्थी चक्क एसटी बसच्या टपावर बसुन प्रवास करतांना दिसून आले. त्यामुळे बस चालक आणि वाहकाने विद्यार्थ्यांना टपावर कसे काय बसू दिले आणि बसल्यावर बस कशी काय पुढील प्रवासासाठी रवाना झाली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

बसच्या टपावर प्रवास केल्याच्या प्रकाराबाबत बसवरील चालक आणि वाहक यांची चौकशी करण्यात येईल. घडलेला प्रकार हा चुकीचाच असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. 
- रितेश फुलपगारे, आगार व्यवस्थापक, खामगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com