फेसबुक फ्रेंडशिप पडली महागात; रुग्णालयात नेऊन केला बलात्कार

A Facebook friend raped a young woman in a hospital
A Facebook friend raped a young woman in a hospital

नागपूर -  दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फेसबूकवरून फ्रेंड्‌सशिप करणे चांगलेच महागात पडले. फेसबूक फ्रेंडने तरूणीवर मेडिकल चौकातील एका हॉस्पिटलमध्ये नेऊन बलात्कार केला. ते फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. मनोज निळवंत आस्वले (वय 24, वनदेवीनगर, कळमना) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशननगरात राहणारी डॉली (बदललेले नाव) ही 16 वर्षीय पीडित दहावीत शिकते. तिचे आईवडील मोलमजुरी करतात. तिची मार्च 2018 पूर्वी आरोपी मनोज आस्वले याच्यासोबत फेसबूकवरून फ्रेंडशिप झाली. मनोज हा मनपाच्या कचरा उचलण्याच्या वाहनावर कंत्राटी मजूर म्हणून नोकरीवर आहे. दोघांच्या भेटीगाठी झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिला घरी बोलावून तिच्याशी अश्‍लिल कृत्य केले. त्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला. तो व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मनोज तिला ब्लॅकमेल करीत होता. गेल्या वर्षभरापासून तिचे लैंगिक शोषण करीत होता. त्याच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या डॉलीने कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनोज आस्वले याने गुन्ह्याची कबुली दिली त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com