बस आणि ट्रकच्या अपघातात पाच जण ठार

बस आणि ट्रकच्या अपघातात पाच जण ठार

गडचिरोली: आज बुधवारी सकाळच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीपासून पाच किमीवरील गुरुपल्ली गावाजवळ अहेरी डेपोच्या बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात पाच जण ठार झाल्याची घटना घङली.

ही टक्कर इतकी जबरदस्त होती की बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुराडा झाला. या बसमध्ये काही प्रवासी अडकल्याचे समजते. सकाळच्या वेळेस निघालेली ही बस शाळकरी विद्यार्थ्यांनी अधिक भरली होती.जखमींना एटापल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com