चौथ्या आरोपीची कारागृहात रवानगी, बिबट्याचा बछडा मृत्यू प्रकरण

File photo
File photo

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : शेंडाजवळील जंगल परिसरात झालेल्या बछड्याच्या मृत्यू प्रकरणातील चौथा आरोपी नीलेश हिरालाल मेश्राम (वय 25, रा. प्रधानटोला) याची सोमवारी (ता. 14) भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. वनकोठडीत असलेल्या नीलेशला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
शेंडा कोयलारी येथील किशोर लांजेवार यांच्या शेतात 6 जानेवारी सायंकाळच्या सुमारास 8 ते 9 महिन्यांचा एक बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत आढळला. त्याच्यावर वनविभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांकरवी औषधोपचार केले. परंतु, त्या बछड्याचा 7 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. 8 जानेवारीला शवविच्छेदन करून कोहमारा येथील वनवसाहत कार्यालय परिसरात जाळण्यात आले. थंडीमुळे बछड्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला होता. परंतु,9 जानेवारीला सोशल मीडियावर या बछड्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले होते. काही व्यक्ती जखमी बछड्याला निर्दयीपणे वागणूक देत असल्याचे आणि सेल्फी काढत असल्याचे या व्हिडिओत दिसले. व्हिडिओच्या आधारे प्रकाश जैपाल पुराम (वय 41, रा. आपकारीटोला), लोकेश नकाराम कापगते (वय 40, रा. कोहळीटोला), आसिफ इडियाल गोडील (वय 39, रा. कोयलारी) या तीन आरोपींना वनविभागाने 9 जानेवारीला अटक केली होती तर, 10 जानेवारीला रात्री 11 वाजता नीलेश मेश्रामला अटक केली होती. नीलेशला 14 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. तथापि, सोमवारी नीलेशला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार, त्याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com