होमगार्डसना 180 दिवस काम

file photo
file photo

नागपूर : पोलिस दलात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी खांद्याला खांदा लावून होमगार्ड कर्तव्यावर तैनात असतात. राज्यात सध्या 39 हजार 208 होमगार्ड कार्यरत असून, त्यांना वर्षातून कमीत कमी 180 दिवस काम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती विश्‍वासनीय सूत्रांनी दिली.
मुंबई होमगार्ड अधिनियमन व नियमातील तरतुदींचा विचार करता वाहतूक नियमन, रुग्णालय, सुरक्षा, शासकीय वसतिगृह सुरक्षा, कारागृहाबाहेर सुरक्षा आदी बंदोबस्तासाठी होमगार्डसना पोलिस कर्मचाऱ्यांसोबत कर्तव्यावर तैनात करावे. जिल्हा कार्यालयांच्या पटावर असलेल्या होमगार्डपैकी 35 ते 40 टक्के होमगार्ड अशा पद्धतीने कर्तव्यावर तैनात केले जावे. कर्तव्यावर तैनात करण्यात येणारे होमगार्ड साखळी पद्धतीने तैनात करण्यावर भर द्यावा. या होमगार्डची दोन महिन्यानंतर बदली करावी, अशाही सूचना होमगार्ड उपमहासमादेशक प्रशांत बुरडे यांनी काढल्या आहेत.
होमगार्ड मानसेवी संघटना आहे. महाराष्ट्रासाठी 53 हजार 856 एवढी होमगार्डची संख्या केंद्र सरकारने निश्‍चित केली आहे. त्यापैकी सद्यस्थितीत राज्यात 39 हजार 208 होमगार्ड कार्यरत आहेत. या होमगार्डला वर्षाच्या 50 टक्के दिवस काम मिळावे याकडे "दै. सकाळ'ने लक्ष वेधले होते. त्यानुसार राज्य शासनाने निर्णय घेऊन होमगार्डला 180 दिवस काम देण्याच्या कामाला राज्यात सुरुवात केली. परिणामी कर्तव्यावर असलेल्या होमगार्डचे चेहरे फुलले. 1 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते, हे विशेष. त्याची अंमलबजावणीही करण्यात येत आहे.
------------
राज्य सरकारने होमगार्डसना 180 दिवस काम देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हा समादेशकांकडून 15 दिवसांपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. होमगार्डची वयोमर्यादा 55 वरून 58 वर्षे केली. मात्र, त्यात क्‍लिष्ट अटी आहेत. 50 आणि 55 वर्षे पूर्ण झालेल्या होमगार्डची शारीरिक पात्रता तपासण्याची ती अट आहे. हे अन्यायकारक आहे. वय वाढल्यानंतर गोळाफेक आणि धावण्याची अट मागे घ्यावी, अशी मागणी आहे. यासह इतरही काही मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
नामदेव खानझोडे, महासचिव, नॅशनल होमगार्ड पोलिस असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com