महाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच

mahabtd
mahabtd

अकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत अमलात अाणलेले महाडीबीटी हे पाेर्टल फेल झाले अाहे. यामुळे शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीपची सर्व कामे मनुष्यबळाद्वारे हाेत असल्याने २०१८-१९ ची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना तत्काळ मिळणे अशक्यच असल्याचे वास्तव अाहे.
दिवाळी हाेऊन गेली तरी अनुसूचित जातीच्या तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली नसल्याने संभ्रम निर्माण झाला अाहे. ७ अाॅगस्ट २०१७ च्यासामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांच्या अाधार सलग्नीत बॅंक खात्यावर रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता.अशाच स्परूपाचा निर्णय २६ अाॅक्टाेबर २०१७ ला विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण विभागानेही अशाच स्परूपाचा शासन निर्णय अमालात अाणला. अाता मात्र महाडीबीटी हे पाेर्टल तांत्रिक अडचणीमुळे पूर्णतः विकसीत हाेऊ शकले नसल्याने शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीपचे काम ठप्प मनुष्यबळाच्या अाधारे करावे लागत अाहे.

डीबीटी द्वारे १ लाख ८९ हजार ४१५ अर्ज प्रप्त
राज्यात डीबीटीद्वारे अनुसूचीत जाती प्रवर्गातून शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीप साठी १ लाख ८९ हजार ४१५ अर्ज प्राप्त झाले अाहेत. यापैकी ३५० अर्ज मंजूर करण्यात अाले तर २६ हजार ५५७ अर्ज फेटाळण्यात अाले. यापैकी ३३६ जणांचे देयक मंजूर झाले असून देयक वितरणाचा अाकडा हा शून्य अाहे.

विभागात अनुसूचीत जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्राप्त अर्जांची संख्या
शहर शिष्यवृत्ती फ्रिशीप एकूण मंजूर देयक
अकाेला- ४२३० २४९ ४४७९ ००
अमरावती ६७३४ ७८८ ७५२२ ००
बुलडाणा २८३० २५१ ३०८१ ००
वाशीम २००७ ७३ २००७ ००
यवतमाळ ३७१० ३२९ ३७१० ००

मनुष्यबळच पर्याय
२०११ ते २०१७ पर्यंत शिष्यवृत्तीचे काम महा ईस्काॅल या पाेर्टलवर व्हायचे समाज कल्याण विभागाचे कर्मचारी अाता कुठे या पाेर्टलच्या कामात तज्ज्ञ झाले असताना हे पाेर्टल बंद करून महाडीबीटी नवे पाेर्टल सुरू करण्यात अाले.या पाेर्टलवर एकदा अपलाेड झालेल्या अर्जात साधा बदल करण्याची व्यवस्थाही स्थनिक पातळीवर नाही.हे पाेर्टल ठप्प झाल्याने अाजवरचे सर्व काम मनुष्यबळाद्वारे करावे लागणार अाहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com