बेपत्ता मैत्रिणी सुरक्षित सापडल्या; सोडले होते घर

बेपत्ता मैत्रिणी सुरक्षित सापडल्या; सोडले होते घर

नागपूर - १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मैत्रिणी अखेर काल नागपूर रेल्वेस्थानकावर सुखरुप सापडल्या. मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने घर सोडल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या मैत्रिणींसोबत एक अल्पवयीन मुलगीसुद्धा आढळली. तिला चाइल्ड लाइनच्या ताब्यात देण्यात आले.  

मिळालेल्या माहितीनुसार, या मैत्रिणींपैकी एक अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाची तर दुसरी अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. दोघींनीही दहावीत ७० टक्‍क्‍यांच्या वर गुण मिळवले. दोघींनाही इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. या समान दु:खामुळे दोघींनीही घरून निघून जाण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादला जाऊन कामासोबतच शिकायचे, असा त्यांचा निर्धार होता. ६ फेब्रुवारीला दोघींनीही घर सोडले. रेल्वेने अहमदाबादला गेल्या. तेथे एका आश्रमात मुक्काम केला. इकडे मुली बेपत्ता असल्याने पालकांनी शहर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार तपास सुरू झाला. त्यांचे छायाचित्र आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांना पाठविण्यात आले. मुलींचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. पोलिस अहमदबादलाही जाऊन आले. पण, उपयोग झाला नाही. 

इकडे दोघींनाही प्रवेशासाठी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी त्या दोघीही सोमवारी रात्री नागपुरात परतल्या. वाटेत त्यांना एक अल्पवयीन मुलगी भेटली. तिलाही मैत्रिणींनी सोबत घेतले. पण घरी जायचे कसे, या विचारात त्या रेल्वेस्थानकावरच थांबल्या. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांना तीन अल्पवयीन मुली आढळल्या. त्यातील दोघी बेपत्ता मैत्रिणीच असल्याची खात्री पाहता क्षणीच जवानांना पटली. 

कायदेशीर प्रक्रियेनंतर मुलींना संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन मुलीला चाइल्ड लाइनच्या मदतीने शासकीय वसतिगृहात पाठविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com