देहव्यापारासाठी मुंबई-पुण्यातील युवतींना पसंती

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

नागपूर - स्थानिक पोलिस स्टेशन आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षित धोरणामुळे शहरात सध्या देहव्यापार धडाक्‍यात सुरू आहे. शहरातील अनेक पॉश इमारती, काही मोठमोठी हॉटेल्स, ब्यूटी पार्लर्स, स्पॉ ॲण्ड मसाज आणि फार्महाउसवरून देहव्यापार संचालित होत आहे. शहरात मुंबई, कोलकाता, पुणे, दिल्ली, इंदूर, मणीपूर, आसाम या शहरांसह बांगलादेशातील तरुणींचा देहव्यापारासाठी वापर करण्यात येत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी) गांभीर्य नसल्यामुळे केवळ नागरिकांच्या टिप्सच्या भरोशावर शहरातील ‘सेक्‍स रॅकेटवर’ नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरातील मोठमोठ्या दलालांच्या भेटीगाठी काही पोलिस कर्मचारी घेत असून त्यांची हुडकेश्‍वरमध्ये असणाऱ्या प्रणिता या महिला दलालाच्या घरात बैठक असते.

सचिन आणि प्रणिता या दोन दलालांचा शहरात दबदबा असून ‘हायप्रोफाइल्स गर्ल्स’ आंबटशौकिनांना पुरविण्यात हे दोघे टॉपवर आहेत. मीनाक्षी, सचिन आणि आकाश हे मुंबई, दिल्ली, पुणे आणि कोलकात्यातील युवतींना लाखो रुपयांच्या करारावर नागपुरात आणतात. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये त्याचे ग्राहक बांधलेले असून युवतींसाठी कारसुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. यासोबतच फार्महाऊस आणि स्पेशल पार्टी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुलींचा पुरवठा हे दलाल करतात. 

अल्पवयीन मुलींची मागणी
या व्यवसायात अल्पवयीन मुलींची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दलाल आर्थिक परिस्थितीने खचलेल्या अल्पवयीन मुलींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून देहव्यवसायात ओढतात. कमी वेळात जास्त कमाई होत असल्यामुळे अल्पवयीन मुलीही या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. अल्पवयीन मुलींच्या अश्‍लील चित्रफिती बनवून तिला या व्यवसायात राहण्यास भाग पाडले जात आहे. 

एसएसबी ठरला पांढरा हत्ती
गेल्या आठ महिन्यांपासून शहरात मोजकेच छापे एसएसबीने घातले आहेत. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरतेय असा संशय निर्माण झाला आहे. एसएसबीच्या सुस्त धोरणामुळे शहरातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी ‘सेटिंग’ असल्यामुळे एसएसबी विभाग केवळ पांढरा हत्ती ठरत असल्याचे बोलले जाते.

ऑनलाइन ‘एस्कॉर्ट’  
आंबटशौकिनांना नागपुरात ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर कॉलगर्ल पुरविण्याचा धंदा जोरात सुरू आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून एकाही ऑनलाइन दलालाच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला नाही. इंटरनेटच्या माध्यमातून ‘ईझी’ देहव्यापार सुरू आहे. सीताबर्डी, अंबाझरी, इंदोरा, धंतोली, व्हेरायटी चौक अशा ठिकाणी ऑनलाइन एस्कॉर्ट सर्व्हिस सुरू असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com