बेघर म्हणाले, ‘अपना टाइम आएगा’ 

बेघर म्हणाले, ‘अपना टाइम आएगा’ 

नागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना चक्क मल्टिप्लेक्‍समध्ये ‘गली बॉय’ हा चित्रपट दाखविला. या बेघरांनीही ‘अपना टाइम आएगा’ म्हणत चित्रपटाचा आनंद लुटला. 

पालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बेघर निवाऱ्यातील सोयींसोबतच त्यांच्या मनोजरंजनाचीही काळजी घेण्यात येत आहे. शहर समृद्धी उत्सवांतर्गत बेघर निवाऱ्यातील बेघरांना इंदोरा चौकातील मल्टिप्लेक्‍समध्ये ‘गली बॉय’ चित्रपट दाखविण्यात आला. एरवी या बेघरांच्या जेवणाचेही वांधे असते. मात्र महापालिकेने त्यांना निवारा उपलब्ध करून देतानाच त्यांना विविध मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यावरही भर दिला आहे. आज प्रथमच या बेघरांनी मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपट बघण्याचा आनंद लुटला. त्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. ‘अपना टाइम आएगा..’ या गीताने तर त्यांना प्रेरणाच दिली. चित्रपटातील या गाण्याचे फलक झळकावित या बेघरांनी इतरांनाही ‘हताश होऊ नका. आनंदाने जगा’ असा मंत्र दिला. याप्रसंगी बेघरांसह दीनदयाल अंत्योदय योजना-नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे यांचेसह सर्व निवारागृहाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते. दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत महानगरपालिका, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com