उपराजधानी "सेफ झोन'मध्ये

file photo
file photo

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर तालुक्‍यामध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्‍टर स्केलवर 3.7 तीव्रतेची नोंद करण्यात आली. या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने काळजीचे कारण नसून नागपुरसह विदर्भ सेफ झोनमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे.
यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात रात्री 9 वाजून 12 मिनिटे आणि 6 सेकंदांवर धरणीकंपाची नोंद झाली. 5.9 रिश्‍टर स्केलपर्यंतचा भूकंप सुरक्षित मानला जातो. त्या तुलनेत शुक्रवारी जाणवलेला कंप फारच सौम्य स्वरूपाचा आहे. नांदेडच्या दक्षिणेला गोदावरीच्या पात्रालगत तसेच यवतमाळ नजीकच्या प्राणहिता-गोदावरी ग्रेबनजवळ जमिनीखालील स्तरात भेगा आहेत. त्यातील हालचालींमुळे या भागात भूकंप जाणवतात. नांदेड जिल्ह्यात भूकंपाचा पूर्व इतिहास आहे. येथे यापूर्वी 2011 आणि 2007 मध्येसुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गोदावरीलगतचा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील असणारा भाग लातूरनजीक आहे. या स्तरात झालेल्या हालचालींमुळे 1993 ला किल्लारीत तीव्र स्वरूपाचा भूकंप आला होता. नागपूरसह विदर्भाचा बहुतेक भाग झोन -2 मध्ये येतो. यामुळे तीव्र स्वरूपाच्या भूकंपाचा कोणताही धोका नाही. यवतमाळ आणि नांदेडच्या नागरिकांनीसुद्धा धाबरून जाण्याचे कारण नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com