मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेची पाटी कोरी

file photo
file photo

यवतमाळ : शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीजजोडणी देताना अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांना लवकरात लवकर जोडणी मिळावी, यासाठी महावितरणने गाजावाजा करून अनेक योजनांची घोषणा केली. "एचव्हीडीएस', सौरपंप योजनेतून तातडीने जोडणी देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात आजही वीजजोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने वीज महावितरणचा केवळ घोषणांचा सुकाळ असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
उच्चदाब, लघुदाब वितरणप्रणाली व यानंतर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा धडाका महवितरणने सुरू केला. प्रत्यक्षात या योजनेतून शेतकऱ्यांना कनेक्‍शन घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत जिल्ह्यातील दोन हजार 917 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. वीजजोडणीसाठी प्रस्ताव दाखल केलेल्या सर्व शेतकऱ्यांना महावितरणने कोटेशन दिले. एक हजार 344 शेतकऱ्यांनी महावितरणकडे पैसे भरलेत. त्यातील 149 शेतकऱ्यांना वीजजोडणीची वर्कऑर्डर देण्यात आली. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ दहा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची जोडणी झाली आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पीक अडचणीत आली आहेत. अशास्थितीत पाणी देऊून पिकांना वाचविण्याची धडपड शेतकऱ्यांची सुरू आहे. वीजपंपाऐवजी सौरपंप लवकर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, या ठिकाणीही शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2019पर्यंत आठ हजार 119 शेतकरी पेड पेंडिंग आहेत. त्यातील 805 वीजजोडणी महावितरणने केली असली; तरी अजून जवळपास सहा हजार शेतकरी वीजजोडणीच्या रांगेत आहेत.
अडचणी
- पाच एकरांपर्यंत तीन एचपीची मर्यांदा
- पाणी लिफ्ट करण्यावरून साशंकता
- सौर कृषिपंप चोरी गेल्यास काय?
- भविष्यात वीजजोडणीची गरज पडल्यास जोडणी मिळणार का, याबाबत साशंकता
- जलपातळी खाली गेल्याने मोठ्या पंपांची मागणी

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
अर्ज प्राप्त-2,917
कोटेशन दिले-2,917
कोटेशन भरले-1,344
वर्कआर्डर-149
प्रत्यक्षात जोडणी-10

उच्चदाब प्रणालीतून समाविष्ट कनेक्‍शन
1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2018
ग्राहक - 6887
निधी - 176 कोटी

1 एप्रिल 2018 ते मार्च 2019 आलेले अर्ज
1,232

वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून गतीने कामे करून घेतली जात आहेत. एचव्हीडीएस योजनेतील सहा हजार 887पैकी 805 जोडणी झाल्या आहेत. सौर कृषिपंप योजनेच्या कामांना गती दिली असून, लवकरात लवकर जोडणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- सुरेश मडावी, अधीक्षक अभियंता, महावितरण, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com