नागपूर : आत्महत्येची धमकी देऊन प्रेयसीवर बलात्कार 

नागपूर : आत्महत्येची धमकी देऊन प्रेयसीवर बलात्कार 

नागपूर : शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार केला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बजाजनगरात घडली.

आरोपी रोहन (बदललेले नाव, वय 17 वर्षे) हा महालमधील चिटणीसपुरा येथे राहतो. तर पीडित मुलगी स्नेहा (बदललेले नाव) ही अजनीत राहते. दोघेही 2017 मध्ये तंत्रशिक्षण घेताना एकमेकांची ओळख झाली. दोघांची मैत्री झाली. दोघांचे एकमेकांच्या घरी सुरू झाले. दरम्यान, रोहनचे स्नेहावर एकतर्फी प्रेम झाले. मात्र, त्याच्या प्रेमाला ती विरोध करीत होती. 18 जुलैला दुपारी रोहन तिच्या कॉलेजच्या समोर गेला. तेथून फोन करून तिला बाहेर बोलावले. तिला सोबत चालण्यास दबाव टाकला. दोघेही दुचाकीने त्याच्या महालमधील घरी आले. घरातील मंडळी गावाला निघून गेल्यामुळे घरात कुणीही नव्हते. दोघेही रात्री दहा वाजेपर्यंत थांबले. तिने घरी सोडून देण्यास सांगितले असता त्याने रात्रभर थांबण्यासाठी बळजबरी केली. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. तिने नकार दिला असताना त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे स्नेहाचा नायलाज झाला. रोहनने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दुसरीकडे स्नेहाचे आईवडील तिचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी घरी आल्यानंतर कसून चौकशी केली असता स्नेहाने झालेला सर्व प्रकार आईला सांगितला. कुटुंबियांनी विश्‍वासात घेऊन बजाजनगर पोलिसात रोहनविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com