देहव्यवसायातील तरुणींचे दोन्हींकडून शोषण

Prostitute-Business
Prostitute-Business

नागपूर - उपराजधानीत फोफावलेल्या देहव्यापारात केवळ नागपुरातीलच नव्हे तर देश-विदेशातील तरुणींची संख्या बरीच आहे. देहव्यापाराच्या दलदलीत ८५ टक्‍के तरुणी-महिला केवळ आर्थिक अडचणींमुळे येतात तर १५ टक्‍के तरुणी झटपट पैसा कमवून झकपक राहणीमान मेंटेन करण्यासाठी येतात. एकदा देहव्यापाराच्या दलदलीत उतरले की त्यामधून निघणे कठीण होते. यात तरुणींचे ग्राहक आणि दलालांकडून आर्थिक, लैंगिक, शारीरिक आणि सामाजिक शोषण होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

उपराजधानीत हायप्रोफाइल ‘सेक्‍स रॅकेट’मध्ये १२ ते १९ वयोगटातील मुलींची मागणी जास्त आहे. अल्पवयीन मुलगी असल्यास ग्राहकांकडून जवळपास २० हजारांपेक्षा जास्त पैसे महिला दलाल घेतात. नागपुरातील अनेक विद्यार्थिनी किंवा उच्चशिक्षित तरुणी देहव्यापाराकडे वळत आहेत. अशा मुलींना नागपुरातील दलाल जाळ्यात ओढून मोठमोठ्या शहरात पॉश हॉटेलमध्ये लक्षाधीश असलेल्या आंबटशौकिनांना पुरवितात. १२ तासांचे २५ ते ३० हजार रुपये या प्रमाणे महिला दलाल कमाई करतात.

नागपुरातील काही मोठ्या हॉटेल्स, पॉश इमारतीत, ब्यूटी पार्लर्स, स्पा ॲण्ड मसाज आणि हुक्‍का पार्लरमध्ये देहव्यापार फुलत आहे. बॉडी मसाजच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना ब्यूटी पार्लरमध्ये काम देण्यात येत आहे. ग्राहकाकडून हजारोंमध्ये सौदा केल्यानंतर त्या तरुणीच्या हातात पाचशे ते हजार रुपये महिला दलाल ठेवतात.

आंबटशौकिनांच्या नवाबी शौकाखातर ग्राहकही अनैसर्गिक अत्याचारासारखे घृणास्पद प्रकार करतात. सिगारेटचे चटके देणे, दारू पिण्यास भाग पाडणे, ड्रग्जचे सेवन किंवा अश्‍लील नृत्य करण्यास भाग पाडतात. मारहाणही केली जात असल्याचे सत्य बाहेर आले आहे. तरुणींची महिला दलाल आर्थिक तर पैसे मोजणारा ग्राहक शारीरिक शोषण करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘हायफाय’ फार्म हाउस पार्टी
नागपूरच्या आजूबाजूला शेतात बनलेल्या फार्महाउस व पॉश ढाब्यांवर ‘स्पेशल पार्टी’चे आयोजन करण्यात येते. येथे केवळ महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांतील तरुणींना बोलविण्यात येते. जम्मू आणि काश्‍मीर राज्यातील तरुणींची खास मागणी फार्महाउस पार्टीमध्ये असते. दारू, गांजा, ड्रग्ज आणि हुक्‍का आणि अर्धनग्न असलेल्या तरुणींवर एका रात्रीत तीन ते चार लाख रुपये उडविले जातात.

तरुणींची विमानवारी
विदेशातील किंवा अन्य राज्यांतील तरुणींना नागपुरात विमानाने आणण्यात येते. नागपुरातील पॉश हॉटेल्समध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. एका तरुणीसाठी दोन रूम बुक केले जातात. बाजूच्या रूममध्ये ग्राहकांना थांबण्याची व्यवस्था असते. पोलिसांच्या लक्षातही येणार नाही, अशी व्यवस्था महिला दलाल हॉटेल व्यवस्थापकाशी संगनमताने करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com