नागपुरातील देहव्यापार 100 कोटींवर! 

sex_racket
sex_racket

नागपूर : रशिया, इटली, इंग्लंड, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, बांगलादेश, आणि श्रीलंका या देशातील ललनांना "सेक्‍स रॅकेट' अंतर्गत मुंबई-दिल्लीत आणल्या जाते. मुंबईनंतर नागपूरला देहव्यापाराचे उपक्रेंद्र मानल्या जाते. विदेशातील ललनांसह भारतील जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त राज्यातील मुली उपराजधानीतील देहव्यापारात गुंतलेल्या आहेत. त्यामुळे उपराजधानीतील देहव्यापार अंदाजे शंभर कोटींवर गेल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. 

उपराजधानीत बिनधास्तपणे दीडशेवर ठिकाणी हायफाय "सेक्‍स रॅकेट' सुरू आहेत. पोलिसांचा आर्थिक कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणून देहव्यापाराची ओळख आहे. त्यामुळे काही राजकीय व्यक्‍ती आणि पोलिसांच्या आशिर्वादाने देहव्यापार बिनबोभाटपणे सुरू आहे. शहरातील प्रशस्त अशा एकाच इमारतीतील दोन ते तीन माळ्यांवर देहव्यापार चालतो. यामध्ये सर्वांचीच हिस्सेवाटणी होत असल्यामुळे "हाक ना बोंब' असा प्रकार सुरू आहे.

विदेशातील तरूणींना भारतभर विमानसेवा, "थ्री टू फाईव्ह स्टार' हॉटेलमध्ये राहण्याची-खाण्या-पिण्याची व्यवस्था, लाखोंमध्ये असलेला एका तरूणींचा करार तसेच लक्‍सरी कार अशा सुविधा दलालांना पुरवाव्या लागतात. विदेशी तरूणींच्या व्यवस्थेवर लाखों रूपयांचा खर्च दलालांना करावा लागतो. मात्र, लाखोंमधील खर्चातून दलाल विदेशी तरूणींकडून कोट्यावधीत कमाई करतात. उपराजधानीतील काही मोठे हॉटेल्समध्ये सलग काही महिन्यांपर्यंत खोल्या बूक असतात तर पोलिसांनाही वेळेवर "अर्थपूर्ण' भेटी द्याव्या लागत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

साईड हिरोईन- मॉडेल्स व्यवसायात 
दक्षिणात्य चित्रपट सृष्टी, टॉलीवूड, भोजपुरी आणि टीव्ही मालिकांसह जाहिरातीत झळकलेल्या नट्यांचा देहव्यापारात समावेश आहे. विमानतळाजवळील काही हॉटेल्समध्ये मागणीनुसार "साईड हिरोईन' यांना बोलविण्यात येते. लखोपती आंबटशौकींन टीव्ही मालिकांच्या नट्यांवर एका रात्रीत लाखों रूपये उडवितात. हा सर्व प्रकार पोलिसांच्या "अर्थपूर्ण' दुर्लक्षामुळे घडतो. 

सट्‌टेबाज-व्यापऱ्यांसाठी "शो' 
शहरातील काही मोठमोठे हॉटेल्स आणि फार्म हाऊसवर क्रिकेट सट्‌टेबाज आणि मोठमोठे व्यापाऱ्यासह काही राजकीय नेत्यांच्या वाढदिवस किंवा विशेष पार्टीसाठी बॉलीवूड चित्रपटनगरीशी जुळलेल्या मॉडेल्सला बोलविण्याचा पायंडा आहे. त्यांच्यासोबत काही "स्टेज डान्सर' यांनाही ऑर्केस्ट्राच्या नावावर बोलविण्यात येते. त्यामुळे "लेट नाईट पार्टी' नावाने पार्टीचे आयोजन करण्यात येते. हुक्‍का, दारू आणि ड्रग्ससह येथे अश्‍लिल नृत्य प्रस्तूत केल्या जाते. 

दलालांची स्क्रिन टेस्ट? 
देहव्यापाराचे मालक आणि दलाल हे दोघेही देहव्यापारात असलेल्या मुलींचे वेळोवेळी लैंगिक शोषण करतात. हा सर्व प्रकार "स्क्रीन टेस्ट' या नावाखाली खपविल्या जातो. हायफाय आंबटशौकीन ग्राहकांपर्यंत मुलीला पोहचविण्यासाठी तिला स्क्रिन टेस्ट द्यावी लागते. या टेस्टच्या नावावर मुलींचे सामूहिक लैंगिक शोषण केल्या जाते. त्यानंतरच मुलींना हायफाय ग्राहक मिळवून दिल्या जात असल्याचे कडू सत्य समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com