धक्‍कादायक, दहावीची विद्यार्थिनी शिक्षकाच्या वासनेची बळी 

file photo
file photo

नागपूर ः दहावीच्या विद्यार्थिनीवर 50 वर्षीय शिक्षकाने बलात्कार केला. मोबाईलने व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. गुरू शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना अजनीत उघडकीस आली. अजनी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून नराधम शिक्षकास अटक केली. साईबल सुनील चौधरी (रा. चिंतामन अपार्टमेंट, एनआयटी गार्डन, त्रिमूर्तीनगर) असे नराधम शिक्षकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 15 वर्षीय मुलगी स्विटी (बदललेले नाव) अजनीची रहिवासी असून दहावीत शिकते. दहावीत काही विषयात तिचा अभ्यास झाला नसल्याने पालकांनी तिला बक्‍कळ पैसा भरून साईबल चौधरीच्या क्‍लासमध्ये ऍडमिशन मिळवून दिली. गेल्या तीन महिन्यांपासून ती नियमित ट्युशनला जात होती. मात्र, शिक्षक साईबल याची नजर स्विटीवर पडली. तो तिला एक्‍स्ट्रा क्‍लासच्या नावावर सर्व विद्यार्थी गेल्यानंतर थांबवून ठेवायचा. 15 जुलै रोजी पाऊस असताना तिला क्‍लासमध्ये थांबविण्यात आले. त्यानंतर क्‍लाचे शटर बंद करून तिला शिक्षकाने शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, स्विटीने नकार दिला आणि पावसातच घरी जाण्याचा हट्ट धरला. नराधम शिक्षकाने तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. शारीरिक संबंधाचे मोबाईलने व्हिडीओ काढला. कुणालाही सांगितल्यास सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. बलात्कार झाल्यामुळे भेदरलेली स्विटी तीन दिवस ट्युशन क्‍लासला आली नाही. त्यामुळे त्याने तिला फोन करून ट्युशन क्‍लासला ये, नाही तर तुझा व्हिडीओ व्हायरल करतो, अशी धमकी दिली. त्यामुळे ती नियमितपणे क्‍लासला यायला लागली. साईबल चौधरी हा रोजरोसपणे तिला एक्‍स्ट्रा क्‍लासच्या नावाखाली थांबवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. 


अशी आली घटना उघडकीस 
स्विटीच्या स्वभावात बदल झाला होता. तिची घरात चिडचिड होत होती. तसेच तिने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली होती. प्रकृती खराब झाल्यानंतर आईला थोडा संशय आला. तिने स्विटीचा मोबाईल चेक केला असता त्यामध्ये शिक्षकासोबत अर्धनग्नावस्थेत तिचे फोटो आढळले. तसेच शिक्षकाने पाठविलेले अश्‍लिल मॅसेजही दिसून आले. 


अजनी पोलसांचे अपील 
शिक्षक साईबल चौधरी याची वृत्ती लक्षात घेता, ट्युशन क्‍लासमधील आणखी काही विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पालकांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपापल्या पाल्यांशी चर्चा करायला हवी. कुणी शिक्षकाच्या लैंगिकतेचा बळी असल्यास त्यांनी अजनी पोलिसांशी संपर्क साधावा. मुलीचे नाव गुप्त ठेवून शिक्षकावर कठोर कारवाई केल्या जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले. 

पालकांनो सावधान...! 
शिक्षकांसह घरातील नोकर किंवा ड्रायव्हरच्या अत्याचाराचा बळी मुले पडत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. दहावीत असलेल्या मुलीला स्वतःच हिंमत दाखवून पालकांपर्यंत अत्याचाराविरोधात बोलता आले नाही, त्यामुळे तिच्यावर सलग तीन महिने बलात्कार झाला. अशा घटनांना मुले बळी पडू नये म्हणून पालकांनी पाल्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि त्यांच्याशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. 
 
मानसिक विकृती 
उच्चशिक्षित असलेल्यांमधील ही मानसिक विकृती आहे. कुमार वयातील मुलींना जाळ्यात ओढणे सोपे असते. त्या पटकन घाबरून जातात. अशा प्रकाराची सुरुवात कुठेतरी अश्‍लील स्पर्श किंवा बोलण्यातून होते. पालकांनी जर घरातील वातावरण मोकळे ठेवले तर अशा घटनांना वेळीच आळा बसू शकतो. कुणी चॉकलेट किंवा कोल्ड्रिंक दिल्यास नकार द्यायला मुलींना शिकवा तसेच त्यांच्या वागण्यातील बदलांवर लक्ष ठेवा. 
-प्रा. राज आकाश (मानसोपचारतज्ज्ञ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com