व्हिडिओ गेमच्या नादातून विद्यार्थ्याची आत्महत्या

Mobile
Mobile

नागपूर - शाळकरी विद्यार्थ्याने घरी कुणी नसताना गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना महाल परिसरात उघडकीस आली आहे. मोबाईल व व्हिडिओ गेमच्या नादातून त्याने हे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे. 

क्रिश लुनावत (१४) रा. मुंशी गल्ली, महाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सातव्या वर्गात शिकणाऱ्या क्रशला मोबाईल व टीव्हीवरील व्हिडिओ गेम खेळण्याचा फारच नाद होता. त्यासाठी  बरेचदा तो शाळाही बुडवीत असल्याचे शेजारी सांगतात. शेजाऱ्यांमधील चर्चेनुसार क्रिशकडे सतत त्याच्या आईचा मोबाईल राहत असे. सोमवारी त्याची आई बाहेरगावी गेली होती. मोबाईल आईने नेल्यामुळे तो निराश झाला होता. सोमवारी मोठी बहीण नोकरीवर गेली होती. दुपारी २ ते रात्री ८ वाजताच्या सुमारास क्रिशने  राहत्या घरीच सिलिंग फॅनला बेडशिटने बांधून गळफास लावून घेतला. याप्रकरणी आयशा लुनावत हिच्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com