आज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक

File photo
File photo

आज 374 ग्रामपंचायतींची निवडणूक
नागपूर : जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींची निवडणूक व सरपंचपदासाठी उद्या मतदान होत होऊ घातले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. बुधवारी सकाळी 7 वाजतापासून सायंकाळी 5 वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. सरपंचांच्या 383 व सदस्यांच्या 1,604 जागांसाठी अनुक्रमे 1 हजार 309 व 5 हजार 994 उमेदवार रिंगणात आहेत.
मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. एकूण 374 ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे. यासाठी 1359 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या निवडणुकीत सरपंचपदासाठी 1309 व सदस्यपदासाठी 5994 उमेदवार रिंगणात आहेत. सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सदस्यांचे एक-एकच अर्ज दाखल केले असल्याने व दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज न आल्याने अशा ठिकाणी मतदान प्रक्रिया होणार नाही. सरपंच व सदस्य असलेल्या 607 जागांवर एकच उमेदवारी अर्ज आला आहे. सर्वाधिक 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुका काटोल तालुक्‍यात आहेत. तर कामठी तालुक्‍यात 11 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडेल.
5 सप्टेंबरपासून नामांकन दाखल केल्यावर 15 सप्टेंबरला चिन्ह वाटप करण्यात आले होते. गणेशोत्सवादरम्यान निवडणूक प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. गणेशोत्सवाच्या समाप्तीला प्रचारतोफा थंडावल्या होत्या. उद्या होणाऱ्या मतदानातून उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 27 तारखेला मतमोजणी होणार असून निकाल जाहीर केले जातील.
आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढत
जिल्ह्यातील सहा मतदासंघांच्या 13 तालुक्‍यांत होणारी निवडणूक येत्या विधानसभेसाठी आमदारांच्या लोकप्रियतेची चाचणी मानली जात आहे. काटोल मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत आहेत. काटोल व नरखेड तालुक्‍यात यंदा भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससह अपक्षांनी मोट बांधून आघाड्या तयार केल्या आहेत. सावनेर मतदारसंघात भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी समर्थन दिलेल्या उमेदवारांत थेट लढत आहे. कळमेश्‍वर तालुक्‍यातील धापेवाडा येथे प्रचारासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार व पालकमंत्र्यांनी प्रचार केला होता. कामठी मतदारसंघातील कामठी व मौदा तालुक्‍यात भाजप, शिवसेना व कॉंग्रेस समर्थित आघाड्यांमध्ये थेट लढत आहे. रामेटक मतदारसंघातील रामटेक व पारशिवनी तालुक्‍यातील जनमताचा कौल कुणाकडे जातो याकडे लक्ष लागले आहे. उमरेड मतदारसंघातील कुही, उमरेड व भिवापूर तालुक्‍यातही अशीच परिस्थिती आहे. हिंगणा मतदारसंघातील हिंगणा व नागपूर ग्रामीण तालुक्‍यातील जनतेचा कौल कुणाला, याचीही चाचपणी या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com