महिलांची पाउले डिजिटल मार्केटिंगकडे

Digital-Marketing
Digital-Marketing

नागपूर - आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन घराघरांत पोहोचले. प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातूनच जगाशी जोडला गेलेला आहे. महिलाही यात मागे नाहीत.

आरोग्य, मनोरंजन आणि विविध खाद्यपदार्थांची माहिती घेता घेता आपल्या घरगुती उत्पादनांचे मार्केटिंगही त्या सोशल मीडियावर करू लागल्या आहेत. 

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल ॲडव्हाइस, मोबाईल ॲप्स, ई-मेल यांसारख्या विविध इंटरनेट माध्यमांचा वापर केला जातो. डिजिटल मार्केटिंगसाठी लागणारा खर्च अतिशय कमी व खिशाला परवडणारा असल्याने महिला व्यावसायिकांची या माध्यमाला सर्वाधिक पसंती आहे. सध्या प्रत्येक महिला काही ना काही उद्योग करत असते. आपल्या घरगुती उत्पादनांचे मार्केटिंग त्या सोशल मीडियावर करीत आहेत. शोभेच्या वस्तू, कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्‍स, पर्स यासोबतच पापड, लोणची, मसाले यांसारख्या वस्तूची विक्रीही महिलांनी ऑनलाइन सुरू केली आहे. 

आपले उत्पादन मागविण्यापूर्वीच महिला उत्पादनांचे आकर्षक फोटो फेसबुक, व्हॉट्‌सॲप ग्रुपवर टाकत असल्याने संबंधित महिला त्या मालाची बुकिंग करून ठेवतात. यामुळे माल आल्यानंतर तो एका आठवड्यात संपतो. याप्रकारे महिला ‘स्मार्टली’ व्यवसाय करताना दिसून येत आहेत.

मी गेल्या काही वर्षांपासून कॉस्मेटिक्‍स व ज्वेलरी विक्री करत आहे. माझे दुकान घरीच असल्याने मी या उत्पादनांची माहिती देण्यासाठी व्हॉट्‌सॲपचा वापर करते. यातून मी अनेक नवीन ग्राहक जोडले आहेत. 
- सुप्रिया सोनार

आजकाल सर्वच महिला स्मार्टफोन वापरतात. त्यामुळे मार्केटमध्ये नवीन आलेल्या फॅशनबाबत त्यांना माहिती असतेच. अशा वेळी आपल्या उत्पादनाचे वैशिष्ट्य आणि माफक किंमत यावर भर देत मी व्हॉट्‌सॲप आणि फेसबुकवर मार्केटिंग करीत रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करते. 
- कल्पना राऊत

व्हॉट्‌सॲप ग्रुप 
सध्या व्यावसायिक महिलांनी मार्केटिंग करण्यासाठी व्हॉट्‌सॲपचा जोरदार वापर सुरू केला आहे. यासाठी या महिलांनी काही व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून त्या महिलांना आपल्या उत्पादनाबद्दल विविध प्रकारची माहिती देत असतात. महिला या आपल्या वस्तूंचे फोटो अपलोड करत त्यांना त्या वस्तूची माहितीसह किंमतही ग्रुपवरच सांगतात. ग्राहकांशी वन टू ऑल कम्युनिकेशन होत आहे. 

वेळेची बचत 
‘स्मार्ट मार्केटिंग’मुळे व्यावसायिक व ग्राहक या दोघांच्या वेळेची बचत होत आहे. एकाच वेळी व्हॉट्‌सॲप ग्रुप अथवा फेसबुकवर आपण तयार केलेल्या उत्पादनासंबंधी पोस्ट टाकली तर अनेक महिलांना समजते. त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र सांगण्याची गरज भासत नाही. आवडलेली वस्तूची इमेज अथवा कोड नंबर सांगून त्वरित वस्तू विकत घेणेही सोपे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com