Update:  Friday, April 18, 2014 12:44:35 AM IST


| |

मुख्यपान »  » बातम्या
 
6
 
7
 

मानवता हाच खरा धर्म
- - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2012 - 02:30 AM IST

धुळे - मानवाला मानवाशी जोडण्याचे काम धर्म करतो. मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. मानवता हाच खरा धर्म आहे, असा सूर आज येथे झालेल्या सर्वधर्म संमेलनात उमटला.

येथील गल्ली क्रमांक दोनमधील जैनस्थानकात प्रवर्तक पुण्य श्री रमेश मुनीजी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रसंत कमलमुनीजी कमलेश यांच्या उपस्थितीत आज सकाळी सर्वधर्म संमेलन झाले. स्वामिनारायण मंदिराचे सूर्यप्रकाश, शकील अहमद कासवीर, मौलाना महम्मद इसाफी, गुरुद्वाराचे बाबा धीरजसिंह, जग्गासिंग, रणजितसिंग, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे रीटा दीदी, अनिता दीदी, फादर विल्सन रॉड्रिग्ज उपस्थित होते.

रमेशमुनीजी म्हणाले, की धर्म मानवाला मानवाशी जोडण्याचे काम करते. मानवाचे जीवन नैतिक निव्यर्सनी आणि राष्ट्रभक्त बनायला हवे. हेच सर्व धर्माचे मूळ आहे. कमलमुनी कमलेशजी म्हणाले, की धर्माच्या नावावर भेदभाव पसरलेला आहे. ते सर्व मुळासकट काढावयाचे आहे.

फादर रॉड्रिग्ज म्हणाले, की जो कुणावर प्रेम करू शकत नाही, त्याला द्वेष करण्याचा अधिकार नाही. मौलाना कासवीर म्हणाले, की मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. बाबा धीरजसिंह म्हणाले, की गुरूंची वाणी ही सत्य, अहिंसा, प्रेमाचे पालन करणारी आहे. अनिता दीदी म्हणाल्या, की विश्‍वशांतीसाठी परस्पर प्रेम आवश्‍यक आहे. सर्वधर्मीय गुरूंनी जैन समाजाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करीत, असे उपक्रम नित्य व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. चंद्रेश मुनी, विजय मुनी, दिव्य प्रभाजी यांनी विचार मांडले. जैन नवयुवक मंडळाचे अध्यक्ष आश्‍विन बाफना, कार्याध्यक्ष पंकज बागरेचा, तुषार बाफना आदींनी संयोजन केले. समाजबांधवांपेक्षा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जी व्यक्ती व्यसन, भ्रष्टाचार, स्त्री भ्रूण हत्या या सर्व गोष्टींपासून दूर आहे, तोच खरा हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई होय.
- संत कमलमुनी कमलेश

 
6
 
7
 

प्रतिक्रिया
shreeram dinesh joshi - सोमवार, 4 मार्च 2013 - 08:30 PM IST
हा निबंध मला खूप आवडला. कृपया मला आणखी तुमच्या वेबसाईट्स कळवा. लगेच पाठवा
 
3
 
3
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2014 eSakal.com - All rights reserved.
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: