जगात टोमॅटो उत्पादनात चीनचा 31, तर भारताचा 11 टक्के वाटा

जगात टोमॅटो उत्पादनात चीनचा 31, तर भारताचा 11 टक्के वाटा

टोमॅटो (सोलॅनम लायकॉपरसीकम) हे एक महत्त्वाचे पीक आहे. ही फळभाजी अगदी सर्रास नियमित जेवणात तसेच केचप, सॉस, ज्यूस, प्युरी, पास्ता सॉस, साल्सा, टोमॅटो-आधारीत पावडर, सन ड्राईड टोमॅटो, सार-कढी आणि रेडी-टू-इट प्रक्रिया उत्पादनांत वापरली जाते. जगभर 170 दशलक्ष टन (एमटी) हून अधिक टोमॅटोंचे उत्पादन होत असून ते एकूण जगात होणाऱ्या भाजी निर्मितीच्या 15% आहे.  

2002 पासून जागतिक टोमॅटो उत्पादन जवळपास 40% नी वाढले. एफएओ आकडेवारी अनुसार या वाढीमध्ये अग्रगण्य 10 निर्मितीदार देशांचा वाटा समसमान आहे. तर चीनचा वाटा 31% असून तो अग्रेसर आहे. भारताने 2008 पासून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या तुलनेत सातत्याने अधिक टोमॅटो निर्मिती केली. भारताचा निर्मितीमधील जागतिक वाटा 11% आहे. परिणामी, टोमॅटोचे पीक जगभरातील शेतकरी आणि भारतातील शेतकरी अशा दोघांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

बाजारपेठेचे आकारमान आणि टोमॅटोचे कोशिंबिरीतील प्राधान्य लक्षात घेता सुधारीत टोमॅटो हायब्रीडचे चांगले परिणाम शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत. नुझीविडू सीड्स लिमिटेडने नवीन हायब्रीड (संकरीत) प्रकारातील बियाणे भारतातील टोमॅटो पिकवणाऱ्या सर्वच राज्यांमध्ये दाखल केले. पाच वर्षांच्या संशोधन आणि विकासानंतर राजेश (एनटीएच 1813) हे तयार करण्यात आले. 2 वर्षे या उत्पादनाच्या विविध ठिकाणी मुल्यांकन तपासण्या घेऊन हे उत्पादन कितपत सुविधाजनक आहे याची चाचपणी करण्यात आली. उत्पादनाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे उच्च उष्णता झेलण्याची ताकद, अधिक काळ साठवता येण्याजोगे, टीओएलसीव्हीला साजेसे, बुरशीच्या प्रभावामुळे आणि प्रारंभिक रोगामुळे लागेच कोमेजून जात नाही. आकर्षक लालबुंद 90-100 ग्राम वजनाचे एक फळ, प्रत्येक झाडाला भरगच्च फळे, अपेक्षित दर्जाचे उत्पादन देते. 

भारतात भाजी पिकांच्या उत्पादनात बटाटा आणि कांद्यानंतर टोमॅटो तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. टोमॅटो उत्पादन आणि लागवडीचे एकूण क्षेत्रफळ पाहता भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. अंदाजे उत्पादन 19.4 मेट्रीक टन इतके आहे. 2010 पासून भारतातील टोमॅटो  उत्पादनाचे ट्रेंड्स पाहिल्यास निर्मितीच्या मजबूत विस्तारात वाढ झालेली दिसते. यामागील कारण म्हणजे मोठ्या क्षेत्रफळावर करण्यात येणारी लागवड. एक तर या पिकाला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शिवाय इतर पिकांच्या तुलनेत टोमॅटोकरिता शेतक-याला चांगला परतावा मिळतो.  आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडीशा, गुजरात आणि महाराष्ट्र ही भारतातील टोमॅटोउत्पादन घेणारी राज्ये आहेत. टोमॅटो हे बहुढंगी उत्पादन असल्याने दिवसेंदिवस भारतातील शहरी आणि निम-शहरी भागात कोशिंबीर प्रकारातील टोमॅटोला मागणी वाढते आहे.

काही बहुराष्ट्रीय व भारतीय बियाणे कंपन्या सुधारीत टोमॅटो हायब्रीडची निर्मिती करत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन, फळाचा दर्जा आणि कीड व रोग प्रतिकारक वैशिष्ट्यामुळे नफा मिळतो. खालील तक्त्यात टोमॅटोचे उत्पादन घेणारी मुख्य राज्ये, लागवडीचे क्षेत्रफळ, निर्मिती आणि सरासरी उत्पन्न दिले आहे.

राज्य

शेती योग्य जमीन (हजारहेक्टर)

उत्पादन (हजार मेट्रिकटन)

सरासरी उत्पन्न (प्रतिहेक्टेर मेट्रिक टन)

आंध्र प्रदेश

168

3355

20

कर्नाटक

61

2068

33.9

मध्य प्रदेश

66

1937

29.5

तेलंगण

74

1484

20

ओडिय

97

1386

14.3

गुजरात

45

1259

28.2

महाराष्ट्र

50

1200

24

एकूण

882

19402

21.2

पुणे जिल्ह्यातील समाधानी शेतकरी संजय मेहेरकर सांगतात की, “राजेश उष्णता सहन करू शकतो. त्यामुळे तो इतरांपेक्षा भिन्न आहे.” इतर महागड्या बियाण्यांच्या तुलनेत टोमॅटो हायब्रीड बियाणी कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देतात. हायब्रीड तंत्र शेतकऱ्यांना खर्च वसूल करण्यात उपयुक्त ठरते आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक शेतकरी अशोक जाधव म्हणतात की, “मी एका बहुराष्ट्रीय कंपनीचे टोमॅटो वापरत होतो. मला भारतीय कंपन्यांच्या टोमॅटोची चाचणी घ्यायची होती. सुरुवातीला मी काहीसा साशंक होतो. मात्र उष्मा व विषाणू प्रतिकाराबाबतीत उत्कृष्ट परिणाम मिळाल्याने मी राजेशची निवड केली. नुझीविडूने दर्जेदार संकर तयार केला आहे.”

भाज्या संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख डॉ. एसके त्रिपाठी यांनी सांगितले की, “आम्ही मोठ्या फळाकरिता या जातीच्या टोमॅटोचे उत्पादन उच्च तापमान आणि विषाणूना पोषक असलेल्या वातावरणात घेतले. ते कणखर, टिकाऊ राहिले. शिवाय दीर्घकाळ साठवता येत असल्याने लांब पल्ल्याच्या वाहतुकीकरिता किंवा दीर्घकाळ साठवणूक करण्याच्या दृष्टीने उत्तम आहे”.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com