पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील ११ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ

पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील ११ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ

लखनौ, उत्तर प्रदेश - पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा उत्तर प्रदेशमधील ११ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अाहे. उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी केली अाहे. पहिल्या टप्प्यात ७,३७१ कोटींचे कर्ज माफ झाले अाहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात अाली अाहे. 

विशेषतः पहिल्या टप्प्यात छोट्या अाणि सिमांत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला अाहे. राज्यातील ४,८१४ शेतकऱ्यांचे १ ते १०० रुपयांचे, ६,८९५ शेतकऱ्यांचे १०० रुपये ते ५०० रुपयांपर्यंतचे, ५,५५३ शेतकऱ्यांचे ५०० ते १ हजार रुपयांपर्यंतचे तर ४१,६९० शेतकऱ्यांचे १ हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात अाले अाहे. तर ११ लाख २७,८९० शेतकऱ्यांचे दहा हजार अाणि त्यावरील कर्ज माफ झाल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात अाले अाहे. उत्तर प्रदेश योगी अादित्यनाथ यांच्या सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. यामुळे प्रति शेतकरी एक लाखांपर्यंतचा लाभ शेतकऱ्यांना मिळत अाहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com