मधमाशीपालनातून मिळेल उत्पादन वाढीला चालना

मधमाश्‍यांच्या वसाहती शेतात अाणण्यापूर्वी योग्य पूर्वतयारी करणे अावश्यक अाहे.
मधमाश्‍यांच्या वसाहती शेतात अाणण्यापूर्वी योग्य पूर्वतयारी करणे अावश्यक अाहे.

खरीप हंगामाला सुरवात झाली अाहे. शेतीला मधामाशीपालनाची जोड देऊन पिकाचे उत्पादन वाढवता येते. शिवाय पूरक व्यवसायातून जास्तीचे उत्पन्न मिळवता येते. त्यासाठी अातापासूनच व्यवसायाची आखणी करणे गरजेचे आहे. 

मधमाश्यांच्या वसाहती शेतात अाणण्यापूर्वी...
मधमाशीपालनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. शासकीय संस्था तसेच काही सामाजिक संस्थादेखील मधमाशीपालनाचे प्रशिक्षण देतात. शासकीय मान्यता आणि उत्तम मार्गदर्शन तसेच पाठपुरावा करणारी सामाजिक संस्था निवडल्यास जास्त फायदा होईल.

व्यवसाय यशस्वी होण्यासाठी स्वतःची आवड आणि मधमाश्यांचे संगोपन करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण दिलेल्या संस्थेशी सतत संपर्कात राहून अडीअडचणी समजून घ्याव्यात. 

किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर केल्या जाणाऱ्या रासायनिक कीडनाशकांच्या फवारणीमुळे मधमाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत अाहे. त्यासाठी मधमाश्यांना हानिकारक असलेल्या रासायनिक कीडनाशकांची माहिती तज्ज्ञांकडून घ्यावी.

शेजारी असलेल्या शेतामध्ये रासायनिक कीडनाशकांची फवारणी होत असेल, तर त्याविषयी त्या शेतकऱ्यालाही माहिती द्यावी. जेणेकरून त्याने फवारलेल्या कीडनाशकांमुळे मधमाश्यांना धोका पोचणार नाही. कारण हवेद्वारे, पाण्याद्वारे विषारी रासायनिक घटकांचा प्रसार होत असतो.

मधमाश्यांच्या गुणधर्मानुसार मधमाश्या आपल्या वसाहतीपासून त्यांचे खाद्य गोळा करण्यासाठी सुमारे १ ते ५ किलोमीटर परिसरात फिरत असतात. त्यामुळे १ ते ५ किलोमीटर परिसरातील पिकाचे परागीभवन होण्यास मदत होते. त्यामुळे अापण केलेल्या मधमाशीपालनातून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतो हे शेजारच्या शेतकऱ्यांना समजावून सांगावे. 

परागीभवनातून पीक उत्पादनात वाढ
मर्यादित कालावधीत फुलणाऱ्या फुलांचे परागीभवन जर योग्य कालावधीत घडवून आणले, तर नक्कीच मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढू शकेल. 

मधमाश्यांच्या स्वभावानुसार प्रथम त्या आपल्या वसाहती जवळ असणाऱ्या फुलांवर फिरतात. जवळचे खाद्य कमी झाले, की मग आपली खाद्य शोधायची त्रिज्या वाढवतात. त्यामुळे एकाने मधमाशीपालन केल्यामुळे इतरांच्या पिकांचेही उत्पादन वाढण्यास मदत होते.

ज्वारी, बाजरी, मका ही महाराष्ट्रातील मुख्य पिके आहेत. या पिकाच्या फुलोऱ्याच्या अवस्थेत मधमाश्यांच्या एकरी पाच पेट्या ठेवल्यास उत्पादनात अडीच पटीने वाढू शकेल. असे संशोधनातून सिद्ध झाले अाहे. 

- प्रशांत सावंत, ९१७२९५५५७६, 
- सारिका सासवडे, ९४२३५७७१९६

मधमाश्यांद्वारे परागीभवन झाल्यामुळे काही पिकांच्या उत्पादनात होणारी वाढ (टक्के)

    लिंबूवर्गीय फळपिके (संत्री, मोसंबी, लिंबू) - ४७१ ते ९००
    सफरचंद - २१ ते ४१,  
    लिची - ४५३८ ते १०२६६, 
    गाजर बी - ३५४ ते ९८७८ 
    सूर्यफूल - ७२ ते ८२
    बरसीम घास - ३४९७
    कापूस - १६ ते २४
    चेरी - ५६ ते १०००
    स्ट्रॉबेरी - ३८ ते ६८
    करडई - २३ ते २८
    तीळ - ३२
    मोहरी - ४३
    लसूण घास - ११२
    कांदा बी - ९३
    कलिंगड - ७००
    मुळा बी - ५२
    कोथिंबीर - ३०
    बडीशेप - ८१
    मेथी - ८०
    वेलची - २१ ते २७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com