कापूस उत्पादन घटणार

कापूस उत्पादन घटणार

मुंबई (कोजेन्सिस) - भारताचे २०१७-१८ मधील कापूस उत्पादन (ऑगस्ट ते जुलै) २९.५ दशलक्ष गाठी (एक गाठ १७० किलोची) राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) नुकताच व्यक्त केला आहे. यापूर्वी ३० दशलक्ष कापूस गाठी उत्पादनाचा अंदाज होता. तुलनेत अंदाजात घट नोंदविण्यात आली आहे.

देशातील अनेक भागांत अवेळी पाऊस आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र या प्रमुख राज्यांमध्ये ही परिस्थिती गंभीर आहे. भारतासब पाकिस्तान, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही उत्पादन कमी होण्याचा अंदाज असल्याने जागतिक उत्पादनही कमी राहण्याचे यूएसडीएने संकेत दिले आहेत. भारताची आयात १.६ दशलक्ष गाठी राहणार असून, त्यामध्येही गेल्या अंदाजाच्या तुलनेत काहीही बदल करण्यात आलेला नाही.

देशातील कापूस साठास्थिती (दशलक्ष गाठींमध्ये)
१४.६               १३.२
नोव्हेंबर         डिसेंबर

हेक्‍टरी उत्पादकतेमधील घट (किलोग्रॅम प्रति हेक्‍टर)
नोव्हेंबर         ५२८
डिसेंबर         ५३५

निर्यात स्थिती (दशलक्ष गाठी)
आताचा अंदाज    यापूर्वीचा अंदाज
४.३                          ४.६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com