पाच जिल्हे होणार दुष्काळमुक्त

बी. राजशेखर
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

अांध्र प्रदेशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प; राज्य सरकारचा केंद्र, ‘आयएफएडी’बरोबर करार

नवी दिल्ली - अांध्र प्रदेश सरकारने राज्यातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला अाहे. त्यासाठी अांध्र प्रदेश सरकार, केंद्र अाणि अांतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) यांच्यात नुकताच करार झाला अाहे. 

अांध्र प्रदेशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प; राज्य सरकारचा केंद्र, ‘आयएफएडी’बरोबर करार

नवी दिल्ली - अांध्र प्रदेश सरकारने राज्यातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला अाहे. त्यासाठी अांध्र प्रदेश सरकार, केंद्र अाणि अांतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) यांच्यात नुकताच करार झाला अाहे. 

हा करार १ हजार कोटी रुपयांचा अाहे. या प्रकल्पांतर्गत अांध्र प्रदेशातील अनंतपूर, चित्तूर, कडपा, कर्नुल अाणि प्रकाशम अादी पाच जिल्ह्यांतील १.६५ लाख कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार अाहेत. आयएफएडी ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था असून, ती विकसनशील देशांतील ग्रामीण भागात गरिबी निर्मूलनाचे काम करते. या संस्थेकडून अाता अांध्र प्रदेशातील पाच जिल्ह्यांतील दुष्काळमुक्तीसाठी निधी मिळणार अाहे.

याबाबत झालेल्या करारानुसार ५० टक्के निधी ‘आयएफएडी’कडून पुरविण्यात येणार अाहे. तर उर्वरित निधी राष्ट्रीय कृषी विकास बॅंक (नाबार्ड) अाणि मनरेगा योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणार अाहे, असे अांध्र प्रदेशच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव बी. राजशेखर यांनी सांगितले. ‘आयएफएडी’चे या प्रकल्पावर लक्ष राहणार अाहे. पाच वर्षांनंतरही राज्य सरकार हा प्रकल्प पुढे चालू ठेवणार असल्याचे सांगण्यात अाले अाहे.

अांध्र प्रदेशातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा व्यापक 
असा प्रकल्प अाखला अाहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन अाणि तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार अाहे. कृषी उत्पादकता वाढविणे अाणि त्याबरोबरच कृषिपूरक असलेल्या शेळीपालनासारख्या व्यवसायावरही भर देण्यात येणार अाहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होईल. तसेच शेतमाल उत्पादन अाणि विपणनासाठी एक यंत्रणा उभारून अाम्ही शेतकऱ्यांना मदत करणार अाहोत.

- बी. राजशेखर, प्रधान सचिव, कृषी विभाग, अांध्र प्रदेश
 

असा असणार प्रकल्प
पाच जिल्ह्यांतील १.६५ लाख कुटुंबांचे उत्पादनवाढीसाठी एक हजार कोटींचा प्रकल्प
अांतरराष्ट्रीय कृषी विकास निधी ५० टक्के निधी देणार
पाणीबचतीसाठी सूक्ष्म सिंचनावर भर देणार
उत्पादकता वाढीसाठी निविष्ठांचा काटेकोर वापर
कृषिपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना सक्षम करणार
शेळी, मेंढीपानाला चालना देणार
शेतमाल उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार
शेतमाल उत्पादन आणि विपणनासाठी यंत्रणा उभारणार