द्राक्ष, डाळिंब प्रदर्शन स्टॉल बुकिंगसाठी शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नाशिकला १ ते ३, तर सोलापूरला १५, १७ सप्टेंबरला प्रदर्शनाचे आयोजन

पुणे - द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन संशोधन, तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन, आपली शेती संपन्नतेकडे नेण्यासाठी ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने नाशिक येथे १ ते ३ सप्टेंबर आणि सोलापूर येथे १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी, तंत्रज्ञान उद्योजकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, प्रदर्शनात आपल्या दर्जेदर उत्पादनांसाठी हमखास आणि हक्काचा ग्राहक उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनासाठीचे थोडेच स्टॉल शिल्लक आहेत. 

प्रदर्शनाच्या निमित्ताने उद्योगांना राज्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आपली उत्पादने व सेवा सादर करण्याची संधी मिळणार आहे; तसेच प्रदर्शनाची प्रसिद्धी ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून होणार असल्याने हमखास प्रतिसाद मिळून व्यवसायवृद्धीसाठी कृषी उद्योजकांना नवीन संधी मिळणार आहे. 

विविध क्षेत्रांतील उद्योगांचा सहभाग 
प्रदर्शनामध्ये द्राक्ष-डाळिंबसाठी लागणारी पायाभूत सामग्री, ऊतीसंवर्धन (टिश्‍यू कल्चर) रोपे, सूक्ष्मसिंचन, अवजारे, यांत्रिकीकरणाची अवजारे, शेततळ्यांची माहिती, शेडनेट, हेल ग्रीन नेट, खते, औषधे, कीटकनाशके, जैविक खते, निर्यात, प्रक्रिया उद्योग, पॅकिंग, शीतगृहे, पतपुरवठा, द्राक्ष प्रक्रिया, डाळिंब प्रक्रिया आदी विविध क्षेत्रांतील उद्योग सहभागी होणार आहेत. 

स्थळ - नाशिक - राम सीता लॉन्स, औरंगाबाद रोड, नांदुरा नाका, नाशिक, सोलापूर - होम मैदान, सिद्धेश्‍वर मंदिराजवळ, सोलापूर 
स्टॉल बुकिंगसाठी - नाशिक - विजय -  ९८८१३०३८८३, सोलापूर - गणेश - ९५५२५१९९०८
अधिक माहितीसाठी - रूपेश -  ८८८८५२९५००

Web Title: agro news grapes, pomegranate exhibition