नाशिक, सोलापूर येथे द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

कृषी, तंत्रज्ञान उद्योजकांना मोठी संधी; सप्टेंबरमध्ये ॲग्रोवनतर्फे आयोजन
पुणे - द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन संशाेधन, तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने नाशिक येथे १ ते ३ सप्टेंबर आणि सोलापूर येथे १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७’ चे आयाेजन करण्यात आले आहे.  कृषी, तंत्रज्ञान उद्याेजकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, प्रदर्शनात आपल्या दर्जेदर उत्पादनांसाठी हमखास आणि हक्काचा ग्राहक उपलब्ध हाेणार आहे.

प्रदर्शनाच्या निमित्ताने उद्याेगांना राज्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आपली उत्पादने व सेवा सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्रदर्शनाची प्रसिद्धी सकाळ व ॲग्राेवनच्या माध्यमातून हाेणार असल्याने हमखास प्रतिसाद मिळून व्यवसायवृद्धीसाठी कृषी उद्याेजकांना नवीन संधी मिळणार आहे. 

प्रदर्शनामध्ये द्राक्ष-डाळिंबसाठी लागणारी पायाभूत सामग्री, उतीसंवर्धन (टिश्‍यू कल्चर) राेपे, सूक्ष्मसिंचन, अवजारे, यांत्रिकीकरणाची अवजारे, शेततळ्यांची माहिती, शेडनेट, हेल ग्रीन नेट, खते, आैषधे, कीटकनाशके, जैविक खते, निर्यात, प्रक्रिया उद्याेग, पॅकिंग, शीतगृहे, पतपुरवठा, द्राक्ष प्रक्रिया, डाळिंब प्रक्रिया आदी विविध क्षेत्रांतील उद्याेग सहभागी हाेणार आहेत. 

स्टाॅल बुकिंगसाठी - नाशिक - विजय - ९८८१३०३८८३
साेलापूर - गणेश - ९५५२५१९९०८, अधिक माहितीसाठी. रूपेश - ८८८८५२९५००