कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा 

कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा 

पुणे - कोकणात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे व बंधारे भरून वाहू लागले अाहेत. तुलसी, भांडूप, विहार, वैतरणा, भातसा, तानसा या धरणांतील साठ्यातही वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, कोल्हापूर भागात जोरदार पावसामुळे नद्यांना पाणी येऊन धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २६) मराठवाड्यातील जालना आणि विदर्भातील नागपूर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आज (ता. २७) कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सोमवारी माॅन्सून अरबी समुद्राच्या उत्तर भाग, सौराष्ट्र व कच्छच्या काही भागांत दाखल झाला आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मागील ४८ तासामध्ये कोकणातील मुरूड, भिरा, रोहा, अलिबाग, चिपळून, हर्णे, सुधागड पाली, माणगाव, उरण  तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात जोरदार पडला. तसेच कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

पुणे परिसरातही येत्या रविवार (ता.२) पर्यत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकणातील कोयना, डुंगरवाडी, ताम्हिणी, शिरगाव, अंबोणे, भिवपुरी, भिरा, दावडी, लोणावळा, कोयना, धारावी, वळवण, शिरोटा, ठाकूरवाडी, लोणावळा, खोपोली, वाणगाव, खंद या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पन्हाळा, महाबळेश्वर, राधानगरी, पौंड, मुळशी येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली; तर मराठवाड्यात काजी, कळंब, औसा, धर्माबाद, जळकोट, जालना, लातूर, वाशी येथे हलका पाऊस पडला. विदर्भातील  पुसद, दिग्रस, काटोल, लोणार, तुमसर येथेही हलका ते मध्यम पाऊस पडल्याची नोंद झाली. 

गेल्या ४८ तासांमध्ये झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
कोकण - मुरूड २१०, भिरा १५०, रोहा १४०, अलिबाग, चिपळूण, हर्णे १३०, सुधागडपाली १२०, माणगाव, उरण ११०, 
दापोली, पोलादपूर, वसई १००, लांजा, मंडणगड, मुंबई ८०, कर्जत, खालापूर, राजापूर ७०, म्हसाळा, पनवेल, पेन, सावंतवाडी,
श्रीवर्धन ५०, महाड, माथेरान, तलासरी ४०, भिवंडी, कल्याण, सांगे, शहापूर ३०, अंबरनाथ, डहाणू, गुहागर, खेड, मुरबाड, 
पेडणे केपे, रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, वेगुर्ला २०, बेलापूर, कानाकोना, दाबोलीम, जव्हार, पालघर, फोडा, विक्रमगड,
वाडा १०, 

मध्य महाराष्ट्र - पन्हाळा १३०, महाबळेश्वर १०, राधानगरी ७०, पौंड, मुळशी ६०, अक्कलकुवा, चंदगड, जावळीमेधा, शहादा ५०, 
देवळा, साक्री, शाहूवाडी, वडगाव, मावळ ४०, गगनबावडा, शिरूपूर, वेल्हे ३०, भोर, चांदवड, इगतपुरी, कागल, पाटण, सटाना, 
बागलान २०, आंबेगाव, घोडेगाव, बार्शी, कडेगाव, कळवण, खंडाळा, खटाव, वडूज, खेड, राजगुरुनगर, पुणे, सातारा, 
शिराळा, वाई १०

मराठवाडा - काजी, कळंब 30, औसा, धर्माबाद, जळकोट, जालना, लातूर, वाशी 20, बीड, बिलोली, देगलूर, उस्मानाबाद,
सिल्लोड 10

विदर्भ - पुसद 40, दिग्रस, काटोल, लोणार, तुमसर 30, जळगाव, जामोद, सिंरोचा 20, अहिरी, अमरावती, चांदूर, चिखली,
मनोरा, सालेकसा, शेगाव, वरद 10, 
घाटमाथा - कोयना 250, डुंगरवाडी, ताम्हीणी 180, शिरगाव, अंबोणे, भिवपुरी 170, भिरा, दावडी 160, लोणावळा, कोयना, धारावी 90, वळवण 80, शिरोटा 60, 
ठाकूरवाडी, लोणावळा 50, खोपोली 40, वाणगाव 30, खंद 20.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com