धान्योत्पादन विक्रमी २७५ दशलक्ष टनांवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

कृषी मंत्रालय; गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सात टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली - देशात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. यामुळे २०१६-१७ वर्षात विक्रमी २७५.६८ दशलक्ष टन धान्योत्पादनाचा चौथा सुधारित अंदाज कृषी मंत्रालयाने जाहीर केला अाहे. हे उत्पादन याअाधीच्या (२०१५-१६) वर्षाच्या तुलनेत २४.१२ दशलक्ष टनांनी अधिक (९.५९ टक्के) अाहे, तर  २०१३-१४ वर्षाच्या तुलनेत १०.६४ टनांनी अधिक (४.०१ टक्के), तर २०११-१२ ते २०१५-१६ दरम्यानच्या पाच वर्षांतील सरासरी धान्योत्पादनाच्या तुलनेत १८.६७ दशलक्ष टनांनी अधिक (७.२७ टक्के) असल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले अाहे.

२०१५-१६ मध्ये देशात २५१.५७ दशलक्ष टन धान्योत्पादन झाले होते; मात्र त्यात सुधारणा होत धान्योत्पादन विक्रमी पातळीकडे पोचले असल्याचा दावा कृषी मंत्रालयाकडून करण्यात अाला अाहे.

विविध राज्यांकडून विविध पिकांच्या उत्पादनाच्या मूल्यांकनानुसार एकूण धान्योत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर केला अाहे. भात उत्पादन विक्रमी ११०.१५ दशलक्ष टनांवर पोचले अाहे. याअाधीच्या वर्षाच्या तुलनेत भात उत्पादन ३.५० दशलक्ष टनांनी अधिक (३.२८ टक्के) अाहे, तर गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत हे उत्पादन ४.४७ दशलक्ष टनांनी अधिक (४.४९ टक्के) अाहे. गहू उत्पादनही विक्रमी पातळीवर पोचले अाहे. गहू उत्पादन ९८.३८ दशलक्ष टनांवर पोचले असून, हे उत्पादन अाधीच्या वर्षाच्या तुलनेत ६.१० दशलक्ष टनांनी अधिक (६.६१ टक्के) असल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले अाहे.

भरड धान्ये उत्पादन ४४.१९ दशलक्ष टनांवर पोचले अाहे. हे उत्पादन सरासरीच्या तुलनेत २.८५ दशलक्ष टनांनी अधिक अाहे. मक्याचे २६.२६ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे. तुरीचे उत्पादन विक्रमी ४.७८ दशलक्ष टनांवर, उडीद उत्पादन २.८० दशलक्ष टनांवर पोचले अाहे. पीक क्षेत्रात तसेच उत्पादनवाढीमुळे कडधान्याचे विक्रमी २२.९५ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला अाहे. गेल्या पाच वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत हे उत्पादन ५.३२ दशलक्ष टनांनी अधिक (३०.१६ टक्के) अाहे, तर तेलबिया उत्पादन ३२.१० दशलक्ष टनांवर पोचले असल्याचे नमूद करण्यात अाले अाहे.

ऊस उत्पादनात घट, कापूस उत्पादनात वाढ
२०१६-१७ मध्ये उसाचे ३०६.७२ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला अाहे. हे उत्पादन अाधीच्या वर्षीच्या तुलनेत ४१.७३ दशलक्ष टनांनी कमी अाहे. २०१५-१६ मध्ये देशात ३४८.४५ दशलक्ष टन ऊस उत्पादन झाले होते. कापूस पीक क्षेत्रात घट होऊनही उत्पादकता वाढल्याने उत्पादन ३३.०९ दशलक्ष गाठींवर (एक गाठ- १७० किलो) पोचले अाहे. हे उत्पादन अाधीच्या वर्षाच्या तुलनेत १०.२९ दशलक्ष गाठींनी अधिक अाहे. ज्यूट उत्पादन १०.६० दशलक्ष टन झाल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले अाहे.