‘लाइट ट्रॅप’च्या वापरातून किडीच्या वाढीला घातला प्रतिबंध

गोपाल हागे
मंगळवार, 25 जुलै 2017

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात अकोली जहाँगीर येथे विनायक विखार व संजय मिसाळ हे मावसभाऊ भागीदारीत शेती करतात. पारंपरिक पिकांसोबतच भाजीपाला पिके घेण्यावर त्यांचा अधिक भर असतो. वर्षभर वांग्याचे उत्पादन ते वेगवेगळ्या हंगामात घेतात. किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक फवारण्यांचा आधार घ्यावा लागतो. मात्र त्यामुळे खर्च वाढतो. दरांचा विचार केला तर हा खर्च पेलवत नाही. किडींच्या प्रादुर्भावामुळे मालाचा दर्जाही खराब होऊन भाव मिळण्यास अडचणी निर्माण होतात. 

सापळ्यांचा वापर  

ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन दोघा भावांनी नियमितपणे लाइट ट्रॅपचा म्हणजे प्रकाश सापळ्यांचा वापर सुरू केला. यामुळे किडींवर विशेषतः पतंगांवर नियंत्रण ठेवण्यात मोठे यश मिळाले अाहे. 

फळ व शेंडा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी त्याचा वापर उपयोगी ठरला आहे.

एक एकरासाठी साधारणतः दोनशे व्हॅट क्षमतेचा बल्ब वापरला तरी पुरेसे होते असे विखार म्हणतात. या सापळ्यात पतंग अाकर्षित होतात.

संध्याकाळच्या वेळेस म्हणजे घरी परतण्याच्या वेळेस हा बल्ब सुरू केला जातो. पहाटे साडेपाच वाजेपर्यंत या सापळ्यात पतंग अडकलेले पाहण्यास मिळतात. असे पतंग गोळा करून ते नष्ट केले जातात. त्यामुळे किडीची पुढे होणारी उत्पत्तीच थांबविली जाते. अशा प्रकारची उपाययोजना केल्याने फवारणीवरील खर्च किमान ५० टक्के कमी करता येऊ शकतो. पूर्वी एखाद्या किडीसाठी दोन फवारण्या घ्याव्या लागत असतील तर सापळे लावल्यानंतर हीच फवारणी एकावर येऊन ठेपते.  

संत्र्यासाठीही फायदेशीर

विखार म्हणाले, की अामच्या भागात संत्र्याच्या बागा भरपूर अाहेत. आम्हीही संत्रा घेतो. दरवर्षी या पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव होत असतो. या किडीच्या नियंत्रणासाठीही ‘लाइट ट्रॅप’ पद्धतीचा वापर फायदेशीर ठरल्याचा आमचा अनुभव अाहे. यासाठी बागेत बल्ब लावला व बाजूला मच्छरदाणी बांधली तर त्यात या माशीचे पतंग येऊन पडतात. फळांचे होणारे नुकसान टाळता येते व फवारण्यांची संख्याही कमी करता येते. बारामती (जि. पुणे) येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिल्यानंतर तेथे चिकट सापळ्यांचे महत्त्व समजले. टोमॅटोसारख्या पिकात त्यांचा वापर केल्याने चांगला फायदा झाला असे विखार यांनी सांगितले. कृषी विभागानेही यापूर्वी प्रकाश सापळा देऊन त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले होते असे ते म्हणाले. 
- विनायक विखार, ९७६३५५७७५७, अकोली जहाँगीर, ता. अकोट, जि. अकोला