स्वस्तात बनविला छोटा पॉवर टिलर

स्वस्तात बनविला छोटा पॉवर टिलर

पाचोरा (जि. जळगाव) येथील मोटारसायकल दुरुस्तीचे काम करणारे राजेंद्र लोहार यांनी उपलब्ध इंजिन व अन्य सुट्या भागांचा वापर करीत छोटा पॉवर टिलर बनविला आहे. केवळ १८ हजारांत बनविलेल्या पॉवर टिलरमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल.
 

पाचोरा (जि. जळगाव) येथे विश्वकर्मा वेल्डिंग वर्क्‍सचे संचालक राजेंद्र लोहार हे वेल्डिंगच्या कामांसह गेल्या ३५ वर्षांपासून मोटारसायकल दुरुस्तीचेही काम करतात. त्यांचा उत्कृष्ट मेकॅनिक म्हणून लौकिक आहे. ग्रामीण भागात रहिवास व काळ्या मातीशी जुळलेली नाळ यामुळे शेती आणि शेतकऱ्यांबाबत संवेदनशीलता ते जोपासत आहेत. याच भावनेतून कमी खर्चात शेतीसाठीची अवजारे बनवावीत, असा विचार त्यांनी केला. सुरवातीला विटा तयार करण्याचे यंत्र तयार केले. 

पॉवर टिलर निर्मिती 
गेल्या चार वर्षापासून राजेंद्र लोहार शेतीतील विविध कामे करणारा पॉवर टिलर बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या दुचाकी व रिक्शा यांच्या इंजिन व सुट्या भागांचा वापर करून चार ते पाच यंत्रे तयार केली. त्याच्या चाचण्या शेतामध्ये घेत आवश्यकतेनुसार बदल करत केले. 

हे यंत्र हातात घेऊन शेतात फिरविता येते. त्यावर बसूनही ते शेतात चालविता येते. यंत्राचे गिअर मोटारसायकलप्रमाणे बदलता येतात. विशेष म्हणजे, हातासह पायानेही ते टाकता येतात.

विशेष म्हणजे, या एकाच यंत्राला वखर, कोळपे, टिलर, पाभर यांसह फवारणीसाठीही सहजतेने वापरता येते. यामुळे वेळ व पैशांची बचत होते. मानवी बळही कमी लागते. 
एक एकर शेतीकामासाठी दीड लिटर पेट्रोल लागते.
हातात धरायच्या यंत्र निर्मितीचा खर्च १८ हजार, तर यंत्रावर ट्रॅक्‍टरप्रमाणे बसून चालणाऱ्या यंत्रासाठी सुमारे ७५ हजारांचा खर्च येतो.  

- राजेंद्र लोहार, ९९७५३९३१८१

राजेंद्र लोहार यांनी तयार केलेल्या यंत्राच्या चाचण्या माझ्या शेतामध्ये गेल्या चार वर्षापासून घेत आहोत. त्याद्वारे हलकी नांगरणी, वखरणी, पेरणी व खत देणे ही कामे सुलभरीत्या करता येतात. सध्या पेट्रोल इंजिन वापरले असल्याने खर्चात काहीशी वाढ होते. त्यामुळे पुढील टप्प्यात डिझेल इंजिनचा वापर करता येईल.  
- मोतीलाल पाटील, शेतकरी, पळासखेडा सीम, ता. पारोळा, जि. जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com