जगातील साखर उत्पादन यंदा सात टक्क्यांनी वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - भारत, युरोपीय देश, थायलंड अाणि चीनमध्ये साखर उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे. यामुळे जगातील साखर उत्पादनात २०१७-१८ या वर्षातील हंगामात ७ टक्क्यांनी वाढ अपेक्षित अाहे. या वर्षात साखर उत्पादन १७९.३० दशलक्ष टन होईल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय साखर संघटनेने व्यक्त केला अाहे.

नवी दिल्ली - भारत, युरोपीय देश, थायलंड अाणि चीनमध्ये साखर उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे. यामुळे जगातील साखर उत्पादनात २०१७-१८ या वर्षातील हंगामात ७ टक्क्यांनी वाढ अपेक्षित अाहे. या वर्षात साखर उत्पादन १७९.३० दशलक्ष टन होईल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय साखर संघटनेने व्यक्त केला अाहे.

साखर उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक अाहे. अागामी हंगामात भारतातील साखर उत्पादन ४.५ दशलक्ष टनांनी वाढून २४.८ दशलक्ष टनांवर पोचेल, असे साखर संघटनेने जाहीर केलेल्या तिमाही अहवालात म्हटले अाहे.
जगात यंदाच्या वर्षात साखरेचा वापर १७४.६६ दशलक्ष राहणार अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अागामी हंगामात साखरेचा वापर काही प्रमाणात अधिक होणार अाहे. गेल्या वर्षी १७१.६३ दशलक्ष टन साखरेचा वापर झाला होता; तसेच जागतिक पातळीवर निर्यातीसाठी साखरेची उपलब्धतता लक्षणीय राहण्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. साखरेची निर्यात मागणीपेक्षा अधिक राहील. साखरेच्या निर्यातीत १.९१ दशलक्ष टनांनी वाढ होऊन एकूण निर्यात ६२.१५ दशलक्ष टन होईल, असा अंदाज साखर संघटनेने व्यक्त केला अाहे. गेल्या दोन वर्षांत साखरेच्या साठ्यात तूट निर्माण झाली होती. यंदा साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक राहण्याची शक्यता अाहे. यंदाच्या वर्षात साखरेची मागणी ५७.६२ दशलक्ष टन राहील. गेल्या वर्षी ६०.१२ दशलक्ष टन साखरेची मागणी राहिली होती. यामुळे ४.६४ दशलक्ष टन अतिरिक्त साखर शिल्लक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे.

अॅग्रो

अमेरिकेच्या मध्य पूर्व विभागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनवरील तांबेरा (रस्ट) हा रोगाचा फारसा अनुभव नसला तरी...

09.54 AM

गोठ्यातील सूक्ष्म निरीक्षणाद्वारे व्यवस्थापनामध्ये सुधारणा करता येतात, आजार टाळता येतात, उत्पादनातील घट टाळता येते. म्हणून दररोज...

09.48 AM

खाद्यतेलाच्या गरजा भागवण्यासाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू झाले आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर तेल...

09.48 AM