प्रदेशानुसार आहेत माशांच्या जाती

कृणाली तांडेल, डॉ. गाैरी शेलार, डॉ. पंकजकुमार मुगावकर
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

भारतात गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन मोठ्या प्रमाणावर केले जाते. देशात आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्य गोड्या पाण्यातील मास्त्य संवर्धनासाठी अग्रेसर आहे.  

भारतात गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन मोठ्या प्रमाणावर केले जाते. देशात आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्य गोड्या पाण्यातील मास्त्य संवर्धनासाठी अग्रेसर आहे.  

वेगवेगळ्या मत्स्य जाती 
 भारतीय प्रमुख कार्प मासे 
(मेजर कार्पस - कटला, रोहू, मृगळ)
 मायनर कार्पस (लेबिओ कालबासु, लेबिओ बाटा, लेबिओ फिम्ब्रियातूस, व्हाईटकार्प, लेबिओ कोन्टिस, पुंटिस इत्यादी)
 मुरेल मासे (स्नेकहेड, स्ट्रीप स्नेकहेड आणि मोठ्या डोक्याचा स्नेकहेड)
 कॅट फिशेस (देशी मागूर, पंगस, बोल इत्यादी)
 थंड पाण्यातील मासे ( ट्राउट, महासीर, इत्यादी)
 विदेशी मासे ( कॉमन कार्प, गवत्या आणि चंदेरी)

भारतीय प्रमुख कार्प मासे
भारतात प्रामुख्याने कार्प, कॅटफिशेस आणि कोळंबी माशांचे संवर्धन केले जाते. कार्प माशांचे संवर्धन हे गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाचा कणा आहे. कार्प माशांचे संवर्धन पॉली कल्चर अाणि कंपोझिट कल्चर अशा दोन प्रकारे करता येते. 

पंगस अाणि मागूर
पंगस आणि मागूर या कॅटफिशेसच्या जाती आहेत. त्यामधील पंगस मासा खाडीच्या भागात आढळतो. या माशाचे संवर्धन सांडपाण्यामध्येही करा येते. मागूर मासा डबक्यात आढळतो. त्याची संवर्धन करण्याची पद्धत सोपी आणि कमी खर्चिक आहे.

थंड पाण्यातील माश्यांचे संवर्धन
थंड पाण्यातील माश्यांच्या संवर्धनाचे गोड्या पाण्यातील माश्यांच्या संवर्धनामध्ये महत्वाचे स्थान आहे. थंड पाण्यातील माश्यांचे संवर्धन हे सरासरी ५० ते २५o अंश सेल्सिअस तापमानात करता येते. हे मासे मुख्यतः जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यात आढळतात. महासीर आणि ट्राऊट ही थंड पाण्यातील माश्यांची उदाहरणे आहेत. महासीर मासे मुख्यतः नदी, तलाव आणि सरोवरांमध्ये आढळतात.
- डॉ. पंकजकुमार मुगावकर, ७७३८२४६७८५, (केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई)