शुभेच्छांच्या वर्षावात ॲग्रोवनचा वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पुणे - देशविदेशातील कृषीविषयक घडामोडींसह कोरडवाहू शेतीपासून ते हरितगृहातील निर्यातक्षम शेतीमधील तंत्र, कौशल्य, धोरणात्मक माहिती पुरवत दीपस्तंभासमान कार्य करणाऱ्या ‘ॲग्रोवन’चा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. दूरध्वनी, फॅक्‍स, ई-मेल या संपर्क माध्यमांसह समाजमाध्यमातील ट्विटर, व्हॉट्‌सअप, फेसबुकवर ॲग्रोवनच्या वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. बाराव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील विविध गावांमध्ये पीकनिहाय चर्चासत्रांचे ‘कृषी जागर’ मेळावे घेत ॲग्रोवनने तपपूर्ती साजरी केली. 

पुणे - देशविदेशातील कृषीविषयक घडामोडींसह कोरडवाहू शेतीपासून ते हरितगृहातील निर्यातक्षम शेतीमधील तंत्र, कौशल्य, धोरणात्मक माहिती पुरवत दीपस्तंभासमान कार्य करणाऱ्या ‘ॲग्रोवन’चा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. दूरध्वनी, फॅक्‍स, ई-मेल या संपर्क माध्यमांसह समाजमाध्यमातील ट्विटर, व्हॉट्‌सअप, फेसबुकवर ॲग्रोवनच्या वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. बाराव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील विविध गावांमध्ये पीकनिहाय चर्चासत्रांचे ‘कृषी जागर’ मेळावे घेत ॲग्रोवनने तपपूर्ती साजरी केली. 

‘ॲग्रोवन’कडून आपल्या बारा वर्षांचा प्रवासात शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक ७० हजार पानांपेक्षा जादा माहितीची निर्मिती करण्याची कामगिरी झाली आहे. शेतकऱ्यांना समृद्धीच्या शिवारात पोचविण्यासाठी माहिती, प्रदर्शने, मेळावे, परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे अशा विविध माध्यमातून ॲग्रोवनची टीम झटते आहे. तोच धागा पकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘ॲग्रोवन’ला राज्यभरातून भरभरून शुभेच्छा मिळत होत्या.

कृषी क्षेत्रातील अभ्यासक, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ, खते-बियाणे-कीडनाशक उत्पादक कंपन्यांमधील प्रतिनिधी, तसेच कृषिउद्योग क्षेत्रातील अधिकारी आणि सर्वांत महत्त्वाच्या ठरलेल्या शेतकरीराजाच्या गावागावांतून ॲग्रोवन परिवाराला शुभेच्छा मिळत होत्या. आमचा गाव, आमचा शिवार समृद्ध करण्यासाठी ॲग्रोवनकडून पुरविली जाणारी माहिती लाखमोलाची ठरली, अशा शब्दांत काही शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ खडसे आदींनी ट्विटरवरून ‘ॲग्रोवन’ला शुभेच्छा दिल्या. राज्यभरात तपपूर्तीच्या निमित्ताने झालेल्या मेळाव्यांमध्ये देखील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ‘ॲग्रोवन’चा गौरव केला. तपपूर्ती निमित्ताने सातारा जिल्ह्यात झालेल्या ॲग्रोवनच्या कार्यक्रमात एका शेतकऱ्याने, ‘‘मी शेतकरी कुटुंबातून शिकून चांगला पगार घेणारा शिक्षक बनलो. मात्र, नोकरीपेक्षा शेती फायद्याची असल्याचे सांगणारा ॲग्रोवन माझा प्रेरणास्थान बनला. मी नोकरीचा राजीनामा देऊन आज पूर्णवेळ शेतकरी बनलो आहे.’’ 

कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून यशस्वी वर्तमानपत्र चालविण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी कायम शास्त्रज्ञ व तज्ज्ञांना बांधावर नेण्याची भूमिका ठेवणारे ‘ॲग्रोवन’ हे देशातील एकमेव वर्तमान ठरले आहे. नाशिक, नगर, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यांमध्ये १२ कार्यक्रम ॲग्रोवनकडून घेण्यात आले. विविध तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी या वेळी शेतकऱ्यांशी हितगुज केले.

अॅग्रो

कागदी लिंबाला माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे. त्यामुळे झाड आणि फळांची योग्य वाढ होते. ठिबक सिंचन केले असल्यास...

10.30 AM

पीक अवशेषांचा अधिकाधिक वापर व शेतीतील खर्च कमी करणारे तंत्रज्ञान ही दोन उद्दिष्टे ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध...

10.27 AM

आंब्याच्या तीस वाणांची विविधता  समाधान मानून व विचारपूर्वक केल्यास शेती समृद्धीचे साधन होऊ शकते हे बीड जिल्ह्यातील वांगी...

10.09 AM