विदर्भात पीकविम्यासाठी शेतकरी उदासीन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

नागपूर - पीकविमा भरण्यासाठी अवघा एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र होते. अपवाद वगळता बॅंकांवर देखील विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अल्प होती. 

विदर्भात अनेक वर्षे शेतकऱ्यांनी विमा भरला. परंतु त्यानंतर उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीत विमा कंपनीने निकषाआडून शेतकऱ्यांना मदत देण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विमा भरण्यास निरुत्साह असल्याचे सांगण्यात आले. 

अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांमध्ये मात्र पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली.

दरम्यान पारंपरिक पिकांनाच संरक्षण असल्याने महागाव तालुक्‍यात शेतकऱ्यांमध्ये पीकविम्याबाबत उत्साह नाही. काळी दौलत खान येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेत गेल्या चार दिवसांत केवळ १०० शेतकऱ्यांनीच विमा उतरविला. 

कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पीकविमा योजनेचा प्रसार प्रभावी केला. परंतु आधीच्या अनुभवामुळे शेतकरी पीकविमा भरण्यास तयार नसल्याचे शेतकरी नेते मनीष जाधव यांनी सांगितले.