अॅव्हाकॅडोचा गर टिकेल एक वर्षापर्यंत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

ऑस्ट्रेलियातील खासगी कंपनीने अॅव्हाकॅडो फळांचा गर टिकविण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्र वापरले आहे. त्यानुसार, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह अथवा रसायनाच्या वापराशिवास गोठवलेल्या अवस्थेमध्ये एक वर्षापर्यंत गर टिकवता येतो. गर तपकिरी होण्याच्या समस्येवर मात केल्याचा दावा कंपनीने केला आहे.  

क्विन्सलॅंड येथील सनफ्रेश या कंपनीने अॅव्हाकॅडो फळाचा गर बाजारात आणला आहे. सध्या त्याची निर्यात हॉंगकॉंग, चीन, मकाऊ आणि थायलंड येथे केली जात असून, पुढील टप्प्यामध्ये सिंगापूर आणि मलेशियामध्ये निर्यात होईल. त्या विषयी माहिती देताना कंपनीचे उपमुख्य व्यवस्थापक इव्हान हॅडेमान यांनी सांगितले, की अॅव्हाकॅडो फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून, ती पूर्ण करण्यासाठी सध्याच्या दुप्पट फळांचा वापर केला जाणार आहे. आशियाई बाजारपेठेमध्ये कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह किंवा रसायनांशिवाय फळांच्या गराला मोठी मागणी आहे. मात्र, अॅव्हाकॅडो फळाचा गर कालांतराने तपकिरी रंगाचा होत जातो. त्यामुळे त्याच्या मागणी व विक्रीवर परिणाम होतो. 

शेतकऱ्यांचा सहकारी संघ 
ऑस्ट्रलियातील शेतकऱ्यांचा सहकारी संघ स्थापन केला असून, वर्षभर फळांची उपलब्धता होईल अशा प्रकारे कंपनीने नियोजन केले आहे. ऑस्ट्रेलियातील अॅव्हाकॅडो उत्पादक अशा प्रत्येक पट्ट्यातील शेतकरी या संघामध्ये जोडले असून, ताज्या फळांसह गराच्या निर्मितीवर यामध्ये भर दिला जात असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

टॅग्स