व्यासंगातून घडलेली बहुविध पिकांची शेती

व्यासंगातून घडलेली बहुविध पिकांची शेती

अचलापूर (जि. अमरावती) येथील अतुल लकडे आज पंचक्रोशीत प्रगतिशील शेतकरी म्हणून अोळखले जातात. तसे हे कुटूंब मुळचे कुटासा (ता. अकोट, जि. अकोला) या खारपाणपट्ट्यातील गावचे. मात्र तेथे त्यांची जराही शेती नव्हती. त्यामुळे अतुल यांचे वडील पुरुषोत्तम व आजोबा महादेव गाव सोडून अचलपूर परिसरात आले. 

शून्यातून सुरवात  
अचलपूरला आल्यानंतर गाठीशी असलेल्या थोड्याफार पैशांतून पुरुषोत्तम यांनी त्या काळी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर शेती घेत केळी लागवड सुरू केली. या भागातील पारंपरिक कपाशी घेण्यावरही भर होता. त्या वेळी पैशांच्या व्यवहाराऐवजी एकूण उत्पादनातील अर्ध्या विभागणीचा प्रकार होता. या शेतातील केळी लकडे कोलकता, रायपूर येथील बाजारपेठेत पाठवायचे. तेथे केळीला त्या वेळी चांगले दर मिळत. अशा प्रकारची व्यावसायिकता जपल्याने घरखर्च भागवून काही पैसे गाठीशी उरू  लागले. 

शेतीची खरेदी 
अत्यंत दूरदृष्टीने पुरुषोत्तम लकडे यांनी शेती खरेदी करण्यास सुरवात केली. आज कुटुंबाची  ४९ एकर शेती झाली आहे. अर्थात त्यासाठी लकडे यांना अनेक वर्षे कष्ट उपसावे लागले.  खरेदी केलेल्या शेतीत केळीच घेण्यावर भर दिला. या व्यवसायिक पिकाने आयुष्यात कायम चांगली साथ दिल्याचे अतुल सांगतात. 

अतुल यांनी सांभाळली शेतीची सूत्रे 
साधारण २००८ नंतर शेतीची सूत्रे अतुल यांनी हाती घेतली. पारंपरिक पिकांना त्यांनी फाटा दिला. आज वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते ४९ एकरांवरील शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत.  

मार्केट 
हळदीसाठी वसमत, हिंगोली. व्यापाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अंदाज घेऊन कोणत्या बाजारपेठेत माल पाठवायचा याचा निर्णय. 

 टोमॅटोसाठी स्थानिक अचलपूर. 

संत्रा दिल्ली मार्केटपर्यंत नेतात. काही शेतकऱ्यांकडून संत्रा फळांचे संकलन करून त्यांची विक्री. 

केळीची विक्री थेट स्थानिक व्यापाऱ्यांकडून.  

गुुरुवारी अचलपूरचा आठवडी बाजार भरतो. तेथे शेवगा विक्री होते. दहा ते ४० रुपये प्रति किलो दर  मिळतो.

यशकथांतील शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष भेटी  
अतुल ॲग्रोवनचे जुने वाचक आहेत. यशकथा वाचून संबंधित शेतकऱ्याच्या यशाची कारणे ते शोधतात. त्यांच्या प्रयोगांचे बारकावे अभ्यासतात. राज्यातील अशा ५० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेताला प्रत्यक्ष भेटी दिल्याचे अतुल यांनी सांगितले.    

लकडे यांचे प्रयत्न वा गुणवैशिष्ट्ये
बाजारातील तेजीमंदीचा विचार करुन दरवर्षी प्रत्येक पिकाखालील क्षेत्रात बदल, त्याचपद्धतीने बाजारपेठेची निवड होते. 

शिकाऊवृत्ती, त्यातूनच प्रयोगशील शेतकऱ्यांशी दांडगा संपर्क

संत्रा पट्ट्यात हळद लागवडीचा प्रयोग दहा वर्षांपूर्वी या भागात पहिल्यांदाच केला. हे पीक यशस्वी केल्यानंतर भागातील काही शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण सुरू केले. वसमत (परभणी) येथून हळदीचे बेणे आणून अवघ्या एक एकरावर सुरवात केली. आज २० एकरांपर्यंत क्षेत्र वाढवणे शक्य झाले.  

शेतीची ही आहेत वैशिष्ट्य
     सिंचनासाठी ठिबक 
     टोमॅटोत कीडनियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर
     म्हशी, गायी मिळून सुमारे २४ जनावरांचे संगोपन. शेणखत वर्षाला सुमारे २७ ट्रॉली मिळते. 

‘व्हॉट्सअॅप ग्रुप’द्वारे देवाणघेवाण 
कृषिराज नावाने अतुल यांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. तसेच कसबे डिग्रज (सांगली) येथील   
     हळद संशोधन केंद्रातील तज्ज्ञ जितेंद्र कदम यांच्याही ग्रुप’ मध्ये ते आहेत. राज्यातील हळद उत्पादकांचा समावेश असलेल्या या ‘ग्रुप’वर पिकाच्या व्यवस्थापनाबाबत सल्लामसलत होते. 
     ॲग्रोवनमधील माहितीही ‘शेअर’ केली जाते. एकमेकांशी संवाद साधत शंकांचे समाधान होते.  

अतुल लकडे, ९९२३८५११८५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com