कापसाचे दर स्थिर

कापसाचे दर स्थिर

देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर स्थिर आहेत. सूतगिरण्यांकडील साठा कमी होत असल्यामुळे त्यांना चढ्या दराने कापसाची खरेदी करावी लागत आहे. हजर बाजारात गुजरात शंकर-६ कापसाचे भाव ४३,००० ते ४३,२०० तर महाराष्ट्रात बन्नीचे भाव ४२,५०० ते ४३,५०० आणि तेलंगणात भाव ४३,३०० ते ४३,५०० या दरम्यान आहेत. अनेक जिनर बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कापूस रोखीने खरेदी करून गिरण्यांना उधारीने विकत आहेत.    

कापसाची रोजची सरासरी आवक ६००० गाठी आहे. जस्ट ॲग्री या खासगी कंपनीच्या आकडेवारीनुसार १ ऑगस्टपर्यंत ३३७.८२ लाख गाठी कापसाची आवक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३०४.४६ लाख गाठी आवक होती. देशात १ ऑगस्टपर्यंत ११५ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ९८ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली होती. 

ताज्या माहितीनुसार उत्तर भारत (पंजाब, हरियाणा), महाराष्ट्र (खानदेश, अकोट) पाठोपाठ तेलंगणा येथेही कापसावर पांढरी माशी आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पीकसंरक्षणाच्या उपाययोजना आणि या समस्येची तीव्रता यावर पिकाच्या उत्पादनाची स्थिती अवलंबून राहणार आहे. कापूस उत्पादनात घट झाली तर कापसाच्या दरावर त्याचा थेट परिणाम होईल.  आंतरराष्ट्रीय बाजरात कापसाच्या किमतीत थोडी सुधारणा झाली आहे. जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशांतील हवामानाची स्थिती व त्यात होणारे बदल यांचे कापसाच्या बाजारपेठेत पडसाद उमटत असतात. 

 (लेखक कापूस बाजार विश्लेषक असून `कॉटन गुरू`चे प्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com