देशातील युरिया आयातीमध्ये घट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाची माहिती; उत्पादनात स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट
नवी दिल्ली - देशात २०१५-१६ (एप्रिल ते मार्च) या कालावधीत ८४.७४ लाख टन युरिया आयात करण्यात आला होता. तर २०१६-१७ (एप्रिल ते मार्च) मध्ये ५४.८१ लाख टन युरियाची आयात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयातीमध्ये सुमारे २७ लाख टनांनी घट झाल्याची माहिती सूत्रांनी नुकतीच दिली आहे.

केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयानुसार खतांची आयात-निर्यात याविषयी अहवाल जाहीर केले जात असतात. नुकत्याच एका अहवालानुसार २०१५-१६ च्या एप्रिल महिन्यात १.७१ लाख टन, मे महिन्यात ६.००, जूनमध्ये ८.३०, जुलैमध्ये १०.४२, आॅगस्टमध्ये ६.०५, सप्टेंबरमध्ये २.४६, ऑक्टोबरमध्ये ४.१३, नोव्हेंबरमध्ये ८.४७, तर डिसेंबरमध्ये १.३४ लाख टन युरियाची आयात करण्यात आली होती. २०१६-१७ च्या जानेवारी महिन्यात १.७७ लाख टन, मार्चमध्ये १.७८ तर एप्रिलमध्ये ५.२३ लाख टनांचा युरिया आयात करण्यात आला. 

जागतिक कृषी व अन्न संस्थेनुसार (एफएओ) २०१८ पर्यंत नत्रयुक्त खतांची मागणी ५.६ टक्कांनी वाढत जाऊन ११९.४ दशलक्ष टन राहणार आहे.

आशियातून या खतांना जास्त प्रमाणात मागणी राहण्याची शक्यता आहे. चीन आणि भारतात यापैकी सुमारे ५८ टक्कांची मागणी राहण्याचा अंदाज आहे.